संसदेतील धार्मिक कार्यक्रमावरुन शरद पवार यांच्यानंतर भाजप नेत्यानेच नरेंद्र मोदी यांना घेरले

New parliament building inauguration : नवीन संसदेचे रविवारी उद्घाटन झाले. या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन विरोधकांनी सरकारवर टीका केली होती. त्यानंतर बहिष्कार टाकला होता. आता उद्घा़टन कार्यक्रमानंतरही वाद सुरु आहे.

संसदेतील धार्मिक कार्यक्रमावरुन शरद पवार यांच्यानंतर भाजप नेत्यानेच नरेंद्र मोदी यांना घेरले
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 30, 2023 | 10:28 AM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी देशाच्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन झाले. या समारंभार १९ पक्षांनी बहिष्कार घातला होता. त्यावरून वाद सुरु होता. आता उद्घाटनानंतर वैदिक रिती रिवाजानुसार कार्यक्रम घेतल्यामुळे वाद सुरु झाला आहे. आधी शरद पवार यांनी या प्रकरणावरुन नरेंद्र मोदी यांच्यांवर टीका केली. त्यानंतर आता भाजपमधील नेत्यानेही नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

काय म्हणाले होते शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी धार्मिक विधी करुन नवीन संसद भवनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्वधर्मीयांची प्रार्थना सभाही घेण्यात आली. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेतला होता. ते म्हणाले की, नेहरूंची आधुनिक भारताच्या संकल्पनेस यामुळे धक्का बसत आहे. हे चिंताजनक आहे. आपला देश गेल्या अनेक वर्षांपासून मागे जात आहे. विज्ञानाशी तडजोड करता येत नाही. आधुनिक विज्ञानावर आधारित समाज घडवण्याची भूमिका पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडली. मात्र, नव्या संसदेत नेमके उलटे घडत आहे.

हे सुद्धा वाचा

आता भाजपमधून कोणी केला विरोध

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यांवर नवीन संसदेत धार्मिक विधी केल्यावरुन निशाणा साधला आहे. त्यांनी मोदींवर टीका केली आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट करून लिहिले आहे की, ‘शी जिनपिंग यांच्या नेतृत्वाखाली चीनने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, चीन भारत मातेला साखळदंड घालेल अन् आपली जमीन आपल्यापासून वेगळे करेल. परंतु मोदी फक्त ‘कोणी आलेच नाही’ असा आक्रोश करत राहतील. तांत्रिक उपासनेचा प्रभाव नेहमी उलट होतो, असे रावणाच्या बाबतीत घडले होते.

अजित पवार यांचा पाठिंबा

शरद पवार यांनी या प्रकरणावरुन नरेंद्र मोदी यांच्यांवर टीका केली. शरद पवार यांच्या भूमिकेला पाठिंबा देत सुप्रिया सुळे यांनी तिच भूमिका मांडली. परंतु दुसरीकडे अजित पवार यांनी पाठिंबा दिला आहे. नवीन संसद ही काळीजी गरज होती, जुनी संसद इंग्रजांनी बांधली होती, तेव्हा देशाची लोकसंख्या ३५ कोटी होती, असे अजित पवार म्हणाले.

हे ही वाचा

शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा अजित पवार यांचा वेगळा सूर, दिला मोदींना पाठिंबा

नवीन लोकसभा…तर महाराष्ट्रातून 82 खासदार होतील…काय आहे हा बदल

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.