Chandrayaan-3 च्या यशस्वी मोहीमेनंतर आता सूर्यावर स्वारी, काय आहे ISRO च आदित्य L-1 मिशन

Aditya-L1 : इस्रोने चंद्रावर तिरंगा फडकवला, आता सूर्य मोहिमेची वेळ आलीय. भारताच हे महत्त्वपूर्ण आदित्य L-1 मिशन 2 सप्टेंबरला लॉन्च होणार आहे. हे मिशन का आवश्यक आहे? इस्रो यामध्ये कसं यश मिळवणार? ते समजून घ्या.

Chandrayaan-3 च्या यशस्वी मोहीमेनंतर आता सूर्यावर स्वारी, काय आहे ISRO च आदित्य L-1 मिशन
aditya l 1
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 11:33 AM

बंगळुरु : यशस्वी चंद्र मोहिमेनंतर भारत आता सूर्याच्या दिशेने पाऊल टाकतोय. चांद्रयान-3 च्या यशाने देशात आज उत्साहाच वातावरण आहे. ISRO च्या कामगिरीचा सगळ्यांना अभिमान आहे. या मोठ्या यशानंतर इस्रोने पुढच्या मिशनची तयारी सुरु केली आहे. 2 सप्टेंबरला सूर्याभोवती भ्रमंती करणारं आदित्य-एल1 मिशन लॉन्च होणार आहे. हे मिशन खास आहे. कारण भारताच हे पहिलं सौर मिशन आहे. चांद्रयान-3 चंद्रावरील रहस्यांचा शोध घेत आहे. आदित्य एल-1 च्या माध्यमातून सूर्याचा अभ्यास करण्यात येईल. हे मिशन काय आहे? याचं बजेट किती? त्याचा उद्देश काय? समजून घेऊया.

काय आहे आदित्य-एल 1 मिशन?

पृथ्वीपासून सूर्यापर्यंतच अंतर खूप जास्त आहे. आता जसा चंद्राचा अभ्यास सुरु आहे, तसाच सूर्याचा अभ्यास करण्याचीही तयारी आहे. सूर्याच्या आसपास लांग्रेज पॉइंट आहे. भारताच आदित्य एल-1 उपग्रह याच एका पॉइंटवर जाणार आहे. त्यामुळे या यानाच नाव आदित्य लांग्रेज-1 ठेवण्यात आलं आहे. श्रीहरिकोटा येथील स्पेस सेंटरवरुन हे मिशन लॉन्च करण्यात आलं.

सूर्याच्या अभ्यासासाठी किती उपकरणांचा वापर करणार?

पृथ्वीपासून 1.5 मिलियन किमी अंतरावर आदित्य एल-1 स्थापित करण्याची योजना आहे. या पॉइंटवरुन सूर्यावर 7 दिवस आणि 24 तास नजर ठेवणं शक्य आहे. त्यामुळे इथून अभ्यास करण सोपं होईल. आदित्य L-1 फोटोस्फीयर, क्रोमोस्फीयर या सूर्याच्या बाहेरच्या थरांचा अभ्यास करण्यासाठी सात पेलोड नेण्यात येतील. चार पेलोड सूर्यावर नजर ठेवतील. 3 पेलोड एल-1 पॉइंटच्या आसापासच्या भागाचा अभ्यास करतील.

कोणी मिशनची आखणी केलीय?

बंगळुरुच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्सने (IIA) आदित्य एल-1 मिशनची आखणी केली आहे. इंटर-यूनिवर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी एंड एस्ट्रोफिजिक्स, पुण्याने सोलर अल्ट्रावॉयलेट इमेजिंग टेलीस्कोप (SUIT) पेलोड या मिशनसाठी विकसित केला आहे. आदित्य एल-1 मिशनचा उद्देश

सूर्याच्या आसपासच्या वातावरणाचा अभ्यास करणं

क्रोमोस्फेरिक आणि कोरोनल हीटिंगचा अभ्यास करणं, फ्लेयर्सवर रिसर्च करणं

सौर कोरोनाच्या भौतिकीच्या तापमानाची मोजणी

कोरोनल आणि कोरोनल लूप प्लाज्माच निदान करणं. तापमान, वेग आणि घनत्वाची माहिती काढणं.

सूर्याच्या आसपास हवेची उत्पत्ती, संरचना आणि गतिशीलतेचा अभ्यास

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.