Aditya L1 launch | यशस्वी लॉन्च तर झालं, पण आता इस्रोसमोर सर्वात मोठं चॅलेंज काय असेल?
Aditya L1 launch | या मिशनमधला सर्वात अवघड टप्पा कधी असणार? चंद्रावर पोहोचलो, आपले शास्त्रज्ञ हे सुद्धा करुन दाखवतीलच. आदित्य एल 1 मिशनमध्ये अनेक टप्पे पार करायचे आहेत. पृथ्वीच्या कक्षेत असताना पाच मॅन्यूव्हर होतील. आदित्य एल 1 चा कार्यकाळ पाच वर्षांचा असेल.
बंगळुरु : भारतीय अवकाश संशोधन संस्था ISRO ने शनिवारी सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी आपलं पहिलं सौर मिशन आदित्य एल 1 लॉन्च केलं. लॉन्च यशस्वी झालं. या मिशनच्या माध्यमातून इस्रोच आदित्य एल 1 त्या पॉइंटपर्यंत पोहोचेल, जिथून सूर्य एकदम स्पष्ट दिसेल. या मिशनद्वारे L1 पॉइंट, सूर्याच तापमान, सौर वादळाची कारणं समजणार आहेत. सूर्याबद्दलचा डाटा एकत्र करता येणार आहे. आदित्य एल1 15 लाख किलोमीटरचा प्रवास करुन एल 1 पॉइंटपर्यंत पोहोचणार आहे. आदित्य एल1 एक हायटेक आणि स्मार्ट उपग्रह आहे. या उपग्रहातील अनेक उपकरणं खूप एडवान्स आहेत. बंगळुरुच्या इंडियन इंस्टीट्यूट ऑफ एस्ट्रोफिजिक्सचे प्रोफेसर जगदेव सिंह यांनी याबद्दल माहिती दिली.
हायटेक असूनही भारताच्या पहिल्या आदित्य एल-1 सोलर मिशनमध्ये आव्हान कमी नसतील. नासाचे माजी वैज्ञानिक डॉ. मिला मित्रा यांनी सांगितलं की, आदित्य सॅटलाइट एल-1 पॉइंटवर जाईल. हा स्टेबल पॉइंट आहे. इथून सतत सूर्यावर नजर ठेवली जाईल. आदित्य एल1 ला इथपर्यंत पोहोचवण हे सर्वात मोठं आव्हान असेल. इथे तापमान आणि रेडिएशन प्रचंड असतं. सूर्याच्या तापमानापासून उपग्रहाचा बचाव करुन मिशन पूर्ण करणं चॅलेंजिंग असेल. या मिशनच्या माध्यमातून भारताने आपण टेक्नोलॉजीच्या बाबतीत कोणाच्याही मागे नाही हे दाखवून दिलय.
Here is the brochure: https://t.co/5tC1c7MR0u
and a few quick facts: 🔸Aditya-L1 will stay approximately 1.5 million km away from Earth, directed towards the Sun, which is about 1% of the Earth-Sun distance. 🔸The Sun is a giant sphere of gas and Aditya-L1 would study the… pic.twitter.com/N9qhBzZMMW
— ISRO (@isro) September 1, 2023
लॉन्चिंगसाठी पीएसएलवी रॉकेटच का?
आदित्य एल1 उपग्रहाच लॉन्चिंग पीएसएलवी-सी 57 रॉकेटच्या माध्यमातून केलं गेलं. भारताने आपल्या प्रत्येक मोठ्या मिशनसाठी पीएसएलवी आणि जीएसएलवी रॉकेटची निवड केली आहे. या रॉकेटच्या माध्यमातून मिशन लॉन्च केलय. नासाच्या तुलनेत इस्रोच्या सूर्य मिशनच बजेट खूप कमी आहे. भारत पृथ्वीच्या ऑर्बिटचा वापर करुन आपल मिशन निश्चित लक्ष्यापर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरतो, असं डॉ. मिला म्हणाल्या. पृथ्वीच्या कक्षेचा वापर केल्यामुळे खर्च कमी येतो आणि इंधनही कमी लागतं.