Aditya L 1 successfull launch | यशस्वी लॉन्चिंगनंतर आदित्य L 1 चा पुढचा प्रवास कसा असेल?
Aditya L 1 successfull launch | यशस्वी प्रक्षेपण तर झालय. पण आदित्य L 1 किती दिवस पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणार? पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडल्यानंतर सूर्यापर्यंत पोहोचायला किती दिवस लागतील? जाणून घ्या आदित्यचा सर्व प्रवास
बंगळुरु : श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश तळावरुन आदित्य L 1 या उपग्रहाच प्रक्षेपण झालं. सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी PSLV रॉकेट आदित्य L 1 ला घेऊन सूर्याच्या दिशेने झेपावलं. भारताची ही पहिली सूर्य मोहीम आहे. त्यामुळे या मिशनबद्दल प्रचंड उत्सुक्ता आहे. नुकतच भारताला चांद्रयान-3 च्या मिशनमध्ये मोठं यश मिळालं. चांद्रयान-3 ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. याआधी अशी कामगिरी करणं कुठल्याही देशाला जमलेली नाही. कारण चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचा भूभाग खूप वेगळा आहे. चंद्रावर उतरल्यानंतर प्रज्ञान रोव्हर आणि विक्रम लँडरकडूनही यशस्वी संशोधन कार्य सुरु आहे. चंद्राबद्दल रोज नवनवीन माहिती मिळत आहे. त्यामुळे भारतीयांच्या आदित्य L 1 मिशनकडून अपेक्षा उंचावल्या आहेत.
आदित्य मिशनसुद्धा सोप नाहीय. सूर्याच्या ठरलेल्या कक्षेपर्यंत पोहोचण्यासाठी आदित्यला 125 दिवस लागणार आहेत. हा प्रवास सोपा नाहीय. कारण पृथ्वीपासून सूर्यापर्यंतच अंतर 15 लाख किलोमीटर आहे. तिथपर्यंत पोहोचण एक अवघड टास्क पूर्ण करण्यासारख आहे. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये एक पॉइंट आहे. त्याला L 1 म्हटलं जातं. त्या कक्षेत इस्रोचे वैज्ञानिक आदित्यला स्थापित करतील. भारताच्या अन्य मिशनप्रमाणे हे सुद्धा एक लो कॉस्ट मिशन आहे. फक्त 400 कोटी रुपयांमध्ये हे मिशन पूर्णत्वाला जाणार आहे. जगातील अन्य अवकाश संशोधन संस्था यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करतायत. ही सगळी आपल्या वैज्ञानिकांची कमाल आहे. आदित्य L 1 च वजन 1,480.7 किलो आहे. आदित्य L1 ची लॉन्चिंग पाहण्यासाठी देशभरातून आज लोक मोठ्या संख्येने श्रीहरिकोटा येथे आले होते. त्यांनी इस्रोचा आम्हाला गर्व असल्याच इथे आलेल्या लोकांनी सांगितलं. LEO ऑर्बिटमध्ये स्थापित झाल्यानंतर आदित्यचा आता पुढचा प्रवास कसा असेल?
आदित्य-L1 लोअर अर्थ ऑर्बिटपासून आपल्या प्रवासाला सुरुवात करेल. चांद्रयान-3 प्रमाणे आदित्य सुद्धा पृथ्वीच्या कक्षेत सुरुवातीला भ्रमण करेल. PSLV-XL रॉकेट ठरल्यानंतर आदित्य L1 ला LEO मध्ये सोडेल. पृथ्वीच्या कक्षेत 16 दिवस फिरताना पाच ऑर्बिट मॅन्यूव्हर केले जातील. त्यानंतर आदित्य- L1 पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्राबाहेर जाईल. इथून आदित्यचा हॅलो ऑर्बिटच्या दिशेने प्रवास सुरु होईल. आदित्यच्या या प्रवासाला 109 दिवस लागतील. आदित्य L1 ला दोन मोठ्या ऑर्बिटमध्ये जायचं आहे. हा प्रवास कठीण असेल.