VIDEO:एका पक्ष्यामुळे 185 जणांचे जीव टांगणीला..टेक ऑफ करताना विमानाला लागली आग, इंजिन जळाले, 10 मिनिटं प्रवाशांचा जीव हवेत
पटणा-दिल्ली स्पाईसजेटचे विमान कॉकपिट क्रू रोटेशनच्या काळात टेक ऑफ केल्यानंतर, इंजिन क्रमांक 1वर संशयित पक्ष्याने धडक दिली. त्यानंतर विमानात आग लागली. विमानाच्या कॅप्टनने प्रसंगावधान राखत इंजिन 1बंद केले, आणि पटणा विमानतळावर पुन्हा विमानाचे लँडिंग करण्यात आले.
पटणा– स्पाईस जेटच्या फ्लाईटच्या इंजिनाला आग लागल्याची घटना पटना एयरपोर्टवर घडली आहे. हे विमान पटण्यावरुन दिल्लीला जात होते. विमानाने टेक ऑफ केल्यानंतर, पक्ष्याने विमानाला धडक दिली. त्यामुळे इंजिनाला आग लागल्याची माहिती नियंत्रण कक्षाने दिली आहे. विमानाने दुपारी 11वाजून 55मिनिटांनी टेक ऑफ केले होते, त्यानंतर 12वाजून 20मिनिटांनी अचानक स्फोट होऊन विमानाला आग लागली. 10मिनिटांत पायलटने प्रसंगावधान दाखवत विमान पुन्हा एयरपोर्टवर लँड केल्याने मोठा अपघात टळला. या विमानातून 185जण प्रवास करीत होते. त्यानंतर प्रवाशआंना सुखरुप विमानतळावर परत पाठवण्यात आले असून, संध्याकाळी 4वाजता दुसऱ्या विमानाने त्यांची रवानगी दिल्लीला केली जाणार आहे.
Major tragedy averted. Engine of #Patna #Delhi #SpiceJet flight SG725 with 185 passengers onboard caught fire soon after taking off from Patna airport. The pilot mid air took u turn, did emergency landing at Patna Airport.All passengers are safe. Big thank you to the pilots & ATC pic.twitter.com/l8TD38xfIy
हे सुद्धा वाचा— Tamal Saha (@Tamal0401) June 19, 2022
सुदैवाने जिवीतहानी झाली नाही
विमानात 185प्रवासी होते. आग लागल्यानंतर तातडीने पायलटने प्रसंगावधान राखत विमानाचे सेफ लँडिंग केले. त्यामुळे मोठी दु्र्घटना टळली. 10मिनिटे विमानातील प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला होता, हे मात्र खरे. या दुर्घटनेत कुणीही जखमी वा मृत झाले नसल्याची माहिती देण्यात आली आहे. आता या प्रकरणाची चौकशी होणार असून, तपासातच आग का लागली याचे कारण स्पष्ट होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
New video from inside the plane
This looks very dangerous.#Emergency #SpiceJet #Patna pic.twitter.com/YUEm0csHZC
— Chaudhary Parvez (@ChaudharyParvez) June 19, 2022
विमानाचे 3 पंखे नादुरुस्त झाले
स्पाईसजेटच्या प्रवक्त्यांनी या दुर्घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले की – पटणा-दिल्ली स्पाईसजेटचे विमान कॉकपिट क्रू रोटेशनच्या काळात टेक ऑफ केल्यानंतर, इंजिन क्रमांक 1वर संशयित पक्ष्याने धडक दिली. त्यानंतर विमानात आग लागली. विमानाच्या कॅप्टनने प्रसंगावधान राखत इंजिन 1बंद केले, आणि पटणा विमानतळावर पुन्हा विमानाचे लँडिंग करण्यात आले. विमान थांबल्यानंतर विमानाची तपासणी करण्यात आली, त्यावेळी पक्ष्याला धडक दिल्यामुळे विमानाचे 3 पंखे नादुरुस्त झाले आहेत.
#WATCH Patna-Delhi SpiceJet flight safely lands at Patna airport after catching fire mid-air, all 185 passengers safe#Bihar pic.twitter.com/vpnoXXxv3m
— ANI (@ANI) June 19, 2022
जोरात आवाज आला आणि लागली आग, धूर येण्यास सुरुवात
विमानाने एयपोर्टवरुन टेक ऑफ केल्यानंतर काही वेळातच मोठा आवाज झाला आणि आग लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. त्यानंतर आगीच्या ज्वाळ्या दिसू लागल्या, विमानतळावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते, अशीही माहिती देण्यात आली आहे.
बर्ड हिटिंगचे प्रकरण असण्याची शक्यता
या दुर्घटनेनंतर घटनास्थळी तातडीने बडे अधिकारी दाखल झाले. विमानाच्या एका विंगमध्ये आ लागल्याची माहिती मानवजित सिंह ढिल्लो यांनी दिली आहे. बर्ड हिटिंगमुळे हा प्रकार घडला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
आता जीवात जीव आला-पायलट
या विमानातून प्रवास करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की विमानाच्या खिडकीतून आग दिसू लागली होती. विंडो साईडला बसलेलो असल्याने ही आग स्पष्ट दिसत असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेनंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहे, आता जीवात जीव आला, अशी प्रतिक्रिया पायलटने दिली आहे.
विमानात खूप आवाज येत होता, महिला प्रवाशाची माहिती
विमानाने टेक ऑफ केल्यानंतर 10-15मिनिटांतच काहीतरी गडबड आहे, असे लक्षात आले होते, अशी प्रतिक्रिया एका महिला प्रवाशाने दिली आहे. विमान कधी उजवीकडे तर कधी डावीकड़े झुकत होते. थोड्या वेळासाठी सगळेच प्रवासी घाबरलेले होते, असेही या महिलेने सांगितले आहे.