ISRO : चंद्रयान 3 मोहिमेनंतर आता इस्रोचं ‘मिशन आदित्य’, सूर्याचा अभ्यास का आहे महत्त्वाचा? जाणून घ्या
इस्रोची चंद्रयान 3 मोहिम फत्ते झाल्यानंतर आता पुढच्या मोहिमेसाठी तयारी सुरु झाली आहे. स्पेसक्राफ्टच्या माध्यमातून सूर्याच्या अभ्यास केला जाणार आहे. जाणून घेऊयात या मिशनबाबत..
मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं अखेर चंद्रयान 3 चं मोहीम यशस्वी करून दाखवली आहे. चंद्राच्या पृष्ठभागावरून पहिला फोटोही पाठवला. चंद्रयान 2 मोहिमेच्या अपयशानंतर इस्रोने पुन्हा एकदा उभारी घेतली आहे. दक्षिण ध्रुवावर चंद्रयान उतरवणारा भारत हा पहिला देश आहे. चंद्रयान 3 च्या यशानंतर आता इस्रो आता नव्या मोहिमेसाठी सज्ज झाला आहे. इस्रो ऑगस्टच्या महिन्याच्या शेवटी किंवा सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला आदित्य एल-1 मिशन लाँच करणार आहे. इस्रोची ही सर्वात कठीण मोहीम असणार आहे. आदित्य एल 1 मिशनच्या माध्यमातून सूर्याच्या जवळपास धडक मारली जाणार आहे. भारताने आतापर्यंत लँग्रेंज प्वॉइंजपर्यंत म्हणजेच इतक्या लांब स्पेसक्राफ्ट पाठवलेलं नाही. लॅग्रेंज प्वॉइंट सूर्य आणि पृथ्वीच्या दरम्यान असलेला एक प्वॉइंट आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच सौरमंडळाचा अभ्यास करणार आहे. आदित्य एल-1 सूर्यावर 24 तास आणि सात दिवस नजर ठेवणार आहे.
लॅग्रेंज प्वॉइंटपर्यंत पाठवलं जाईल स्पेसक्राफ्ट
सूर्य आणि पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे मधोमध एक जागा तयार होते. या जागेवर म्हणजेच पृथ्वीपासून 15 लाख किमी पर्यंत आदित्य स्पेसक्राफ्ट पाठवलं जाईल. स्पेसक्राफ्ट या जागेवर टिकवून ठेवणं खूपच कठीण आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यात पाच लॅग्रेंज प्वॉईंट आहेत. यात आदित्य स्पेसक्राफ्ट लॅग्रेंज 1 पर्यंत पाठवलं जाईल. या स्पेसक्राफ्टमध्ये SUIT आणि VELC सारखी दोन प्रमुख उपकरण असतील. VELC च्या माध्यमातून स्पेक्ट्रोपोलरिमॅट्रिक मोजणी केली जाईल. सोप्या भाषेत सांगायचं तर या उपकरणाच्या माध्यमातून सूर्यच्या चुंबकीय स्थितीचा अभ्यास केला जाईल. सूर्याच्या चुंबकीय स्थितीचा अभ्यास करणारा भारत हा पहिला देश असेल.
सूर्याचा अभ्यास का आहे महत्त्वाचा ते जाणून घ्या
सूर्याच्या अभ्यासासोबत सॅटेलाईट वाचवणं हा या मिशनमागचा मुख्य हेतू आहे. सूर्याकडून येणारे रेडिएशन आणि सौर वादळाचा धोका लक्षात घेऊन ही मोहीम आखण्यात आली आहे. यामुळे पृथ्वीच्या खालच्या कक्षेत असलेले सॅटेलाईट खराब होता. त्याचबरोबर सौर वादळामुळे इलेक्ट्रिक ग्रिडही खराब होतात. तसेच रेडिओ कम्युनिकेशन तसेच अंतराळवीराना त्रास होऊ शकतो. आदित्य एल 1 स्पेसक्राफ्ट सूर्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून असेल. तसेच मोठ्या घडामोडीबाबत अलर्ट करेल. आदित्य एल 1 स्पेसक्राफ्ट एक स्पेस दुर्बिणसारखं काम करेल.