Atiq Ahmed Murder : अतिक आणि अशरफ याचं एन्काऊंटर प्रयागराजमध्ये, कनेक्शन नाशकात; एसटीएफने नाशिकमधून कुणाला घेतलं ताब्यात?अतिक आणि अशरफ यांना पोलिसांसमोरच ठोकलं, ‘या’ गाजलेल्या वेब सीरिजची का होतेय चर्चा?; ट्विटरही ट्रेंड सुरू
अतिक आणि अशरफ अहमद या दोन गँगस्टरचा काल खातमा करण्यात आला. तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. या घटनेची देशभरात चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच मिर्झापूर या वेब सीरिजचीही चर्चा सुरू झाली आहे.
प्रयागराज : गँगस्टर अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची हत्या झाली. पोलिसांसमोरच या हल्लेखोरांनी त्यांना ठोकले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या हत्येनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सध्या उत्तर प्रदेशात अतिक आणि अशरफ यांच्या हत्येची चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच मिर्झापूर या वेब सीरिजचीही चर्चा सुरू झाली आहे. ट्विटरवरही या वेब सीरिजचा ट्रेंड सुरू झाला आहे. या एन्काऊंटरची तुलना या वेब सीरिजशी केली जात आहे.
ट्विटरवर लोक मिर्झापूर वेब सीरिजला अतिक अहमदशी जोडून पाहत आहेत. मिर्झापूर ही अत्यंत गाजलेली वेब सीरिज आहे. थ्रिलिंग अशी ही वेब सीरिज आहे. या वेब सीरिजचा एक खास प्रेक्षक वर्गही आहे. या सीरिजमध्ये मर्डर, गोळीबार, मारधाड आदी सीन दाखवण्यात आले आहेत. बेधडक आणि दिवसाढवळ्या होणाऱ्या हत्या हे या वेब सीरिजचं वैशिष्ट्य आहे. ज्या पद्धतीने अनेक राऊंड फायरिंग करत अतिक अहमद आणि त्याच्या भावाला ठोकण्यात आलं, तो व्हिडीओ पाहून लोकांना आपण मिर्झापूर पाहतोय की काय असं वाटलं. या हत्याकांडानंतर लोकांनी ट्विटरवर प्रतिक्रिया देण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे ट्विटरवर मिर्झापूरचा ट्रेंड सुरू झाला आहे.
हा तर टिझर
मिर्झापूरचा तिसरा सीजन यायला बराच वेळ होत आहे. त्यामुळेच थोडा टिझर दाखवण्यात आला आहे, असं एका यूजर्सने म्हटलं आहे. मिर्झापूरसोबतच गुड्डू भैयाच्या नावानेही लोक ट्विट करताना दिसत आहेत. ओरिजीनल यूपीच्या तुलनेत मिर्झापूर काहीच नाही, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
As Mirzapur Season 3 is taking too long to release so they show some teasers before ??#Mirzapur #AtiqueAhmed #UPPolice #UttarPradesh #Encounter pic.twitter.com/Hk2rmOZuqI
— DJOKER♠️ (@AniketN_79) April 15, 2023
मिर्झापूर-3 लवकरच
मिर्झापूरचा दुसरा आणि तिसरा सीजन खूप गाजला होता. प्रेक्षकांना हा सीजन खूपच आवडला होता. त्यानंतर आता प्रेक्षक तिसऱ्या सीजनची वाट पाहत आहेत. या सीजनची शुटिंगही पूर्ण झाली आहे. मात्र, ही सीरिज कधी प्रदर्शित होणार याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र, या वर्षीच ही वेब सीरिज प्रदर्शित केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
Now you know Guddu was a Muslim but #Urduwood depicted his character as a Brahmin boy in #Mirzapur Just another try by Bollywood to set up the #HindutvaTerror angle.#AtiqueAhmed #Encounter pic.twitter.com/0Yrh7xJSwh
— . (@logicalgabbar) April 15, 2023
काय घडलं प्रयागराजमध्ये?
गँगस्टर अतिक आणि अशरफ अहमद यांना काल मेडिकल टेस्टसाठी प्रयागराज मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात येत होते. त्यावेळी अतिक याने मीडियाशी संवाद साधण्यास सुरुवात केली. इतक्यात तीन हल्लेखोर आले आणि त्यांनी अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलिसांसमोरच अतिक आणि अशरफ रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली आहे.
#Mirzapur series is nothing when compared to real UP ?
— Anna Namasthe (@AnnaNamasthe) April 15, 2023