भयंकर, 15 वेळा पाहिला हॉरर सिनेमा तर स्वत:ला समजायला लागला भूत, 20 लिटर पेट्रोल टाकून स्व:ताला घेतले जाळून, पुनर्जन्म घेण्याची इच्छा
तेलगू सुपरहिट सिनेमा अरुन्धतीत अभिनेत्री आपल्या इच्छेने मरते आणि शत्रुंचा बदला घेण्यासाठी ती पुनर्जन्म घेते. या सिनेमापासून प्रेरणा घेत, रेणुका प्रसादही स्वताला संपवून पुन्हा पुनर्जन्म घेण्याच्या विचारात होता. त्यातून त्याचा बळी गोला आहे.
![भयंकर, 15 वेळा पाहिला हॉरर सिनेमा तर स्वत:ला समजायला लागला भूत, 20 लिटर पेट्रोल टाकून स्व:ताला घेतले जाळून, पुनर्जन्म घेण्याची इच्छा भयंकर, 15 वेळा पाहिला हॉरर सिनेमा तर स्वत:ला समजायला लागला भूत, 20 लिटर पेट्रोल टाकून स्व:ताला घेतले जाळून, पुनर्जन्म घेण्याची इच्छा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/08/13032934/cinema-Suicide.jpg?w=1280)
बंगळुरु – अरुन्धती नावाचा तेलगू हॉरर सिनेमा (horror movie)15 वेळा पाहि्ल्यानंतर, एका तरुणाने स्वत:वर पेट्रोल टाकून आत्महत्या (Suicide)केल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकात (Karnataka) टुमकारु जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. अरुन्धती हा सिनेमा पाहून 23 वर्षांच्या तरुणावर मोठा मानसिक परिणाम झाला होता. या सिनेमात असलेले भूत त्याच्यावर स्वार झाल्यासारखे झाले होते. या भुताचा त्याच्यावर इतका परिणाम झआला की त्याने त्याचे एकरावीचे शिक्षणही मध्येच सोडून दिले होते. या तरुणाची ओळख रेणुका प्रसाद अशी पटली आहे. विशेष म्हणजे रेणुका प्रसाद हा अत्यंत हुशार विद्यार्थी होता आणि तो त्याच्या वर्गात नेहमीच पहिला येत असे. त्याला सिनेमाचे व्यसन लागल्यासारखे झाले होते. सिनेमासाठी त्याने अभ्यास करणेही सोडून दिले होते. सिनेमा पाहण्यासाठी त्याचे कुटुंबीय त्याला मनाई करीत मात्र तो ऐकतच नव्हता. जसे सिनेमात होते आहे, तसेच आपल्या कुटुंबीयांनीही वागावे, अशी त्याची अपेक्षा होती. त्याच्या कुटुंबीनियांनी त्याला समजावयाचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर थेट त्याने स्वताला आग लावून घेतल्याची माहितीच कुटुंबीयांना मिळाली आहे.
20 लिटर पेट्रोल स्वत:वर टाकून घेतले जाळून
या तरुणाने अरुन्धती सिनेमातील एक सीन कॉपी करण्याचा प्रयत्न केला. सिनेमातील हिरो प्रमाणे, रेणुका प्रसादने बुधवारी गावाबाहेर जाऊन आपल्या शरिरावर 20 लिटर पेट्रोल टाकून घेतले. त्यानंतर त्याने स्वतालाच आग लावून घेतली. रस्त्यावरुन जाणाऱ्या येणाऱ्यांनी त्याला आगीच्या ज्वाळात पाहिल्यानंतर त्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तो यात 60 टक्के भाजला होता. दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. दरम्यान त्याच्या वडिलांचा याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. कोडिनेगहल्ली पोलीसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची आता ते चौकशी करीत आहेत. रेणुका प्रसादचे कुटुंबीय वयात आलेल्या मुलाच्या आत्महत्येने दु:खी झाले आहेत. त्याच्या मृत्यूवार्तेने शेजार पाजारचे, त्याचे मित्रही हळहळले आहेत.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/08/13025513/King-cobra-Viral.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/08/13022435/Salman-Deer-statue-1.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/08/13023152/Salman-Rashdie.jpg)
पुनर्जन्म घेण्याची होती इच्छा
रेणुका प्रसादने चांगले शिक्षण घेऊन चांगले करिअर करावे अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. दुर्दैवाने सिनेमाच्या व्यसनाने त्याचा मृत्यू झाला. तेलगू सुपरहिट सिनेमा अरुन्धतीत अभिनेत्री आपल्या इच्छेने मरते आणि शत्रुंचा बदला घेण्यासाठी ती पुनर्जन्म घेते. या सिनेमापासून प्रेरणा घेत, रेणुका प्रसादही स्वताला संपवून पुन्हा पुनर्जन्म घेण्याच्या विचारात होता. त्यातून त्याचा बळी गोला आहे.