Kamikaze : रशिया-युक्रेन युद्ध बघून भारताने बनवलं एक घातक अस्त्र ‘कामिकाजे’

Kamikaze : दुसऱ्या देशांच सुरु असलेलं युद्ध पाहून भारतीय वैज्ञानिकांनी एका घातक अस्त्राची निर्मिती केली आहे. भविष्यात युद्धाचा परिणाम बदलण्याची या शस्त्राची ताकद आहे. भारतीय वैज्ञानिकांनी कमी काळात हे अस्त्र बनवलय. इस्रोची सुद्धा या शस्त्राच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका आहे.

Kamikaze : रशिया-युक्रेन युद्ध बघून भारताने बनवलं एक घातक अस्त्र 'कामिकाजे'
Russia ukrain War
Follow us
| Updated on: Aug 19, 2024 | 2:15 PM

सध्या जगात दोन ठिकाणी युद्ध सुरु आहे. मध्य पूर्वेच आखात आणि युक्रेन-रशिया वॉर. रशिया-युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धाला दोन वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे. मात्र, अजूनही या युद्धाचा शेवट दृष्टीपथात नाहीय. सुरुवातीला 10-12 दिवसात रशिया युक्रेनवर विजय मिळवेल असं म्हटलं जात होतं. पण अमेरिका आणि नाटो देशांकडून मिळालेल्या मदतीमुळे युक्रेन अजूनही रशियाला टक्कर देत आहे. उलट युक्रेनने आता रशियाचा काही भाग व्यापला आहे. दुसरं युद्ध मध्य पूर्वेत सुरु आहे, इस्रायल-हमासमध्ये. त्याशिवाय इराण, लेबनान या देशांकडून सुद्धा अधंन-मधन हल्ले सुरु असतात. या युद्धामध्ये सर्वात घातक अस्त्र कुठल ठरतय तर ते म्हणजे मिसाइल आणि ड्रोन्स. रशिया-युक्रेन युद्धात भविष्यात ड्रोन किती शक्तीशाली ठरणार? ते स्पष्ट झालय. शत्रूच्या सैनिकांवर, दारुगोळा भांडारावर हल्ला करण्यासाठी या ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात वापर सुरु आहे.

जगाच्या पाठिवर दोन ठिकाणी सुरु असलेलं हे युद्ध पाहून भारताने सुद्धा एक घातक अस्त्र तयार केलय. त्याचं नाव आहे ‘कामिकाजे ड्रोन’. भारताची एलिट संशोधन संस्था नॅशनल एरोस्पेस लॅबरोटरीजने ‘कामिकाजे ड्रोन’ विकसित केलय. स्वदेशी बनावटीच इंजिन या ड्रोनमध्ये असून 1000 किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करण्याची या ड्रोनची क्षमता आहे. NAL चे संचालक अभय पाशिलकर यांच्या नेतृत्वाखाली या घातक ड्रोनची निर्मिती करण्यात आली आहे. हे कमी खर्चिक, मानवरहीत परिणामकारक हवाई वाहन आहे. एका ठराविक उंचीवरुन हे कामिकाजे ड्रोन उड्डाण करतं. स्फोटक वाहून नेणारं हे ड्रोन टार्गेट जवळ काही वेळ भ्रमण करु शकतं. टार्गेटला धडकल्यानंतर मोठा विस्फोट होतो. कमांड सेंटरमधून हे ड्रोन कंट्रोल करता येतं.

हे अस्त्र बनवण्यात इस्रोचा सुद्धा महत्त्वाचा रोल

30 HP वँकेल इंजिनमुळे हे ड्रोन 100 ते 120 किलो वजन वाहून नेऊ शकतं. यामध्ये 30 ते 40 किलोंची स्फोटक आहेत. NAL ही संस्था CSIR ची घटक आहे. 1959 साली CSIR ची स्थापना झाली. दुसऱ्या महायुद्धापासून कामिकाझे ड्रोनची संकल्पना अस्तित्वात आली. जपानी वैमानिक शत्रूच्या टार्गेटवर थेट आपलं विमान धडकवायचे. यात मानवी जीवाच सुद्धा नुकसान व्हायच. आता कामिकाजे ड्रोनमुळे शत्रुची वित्तहानी, जिवीतहानी होईल पण आपलं मानवी नुकसान होणार नाही. कारण ही मानवरहीत ड्रोन्स आहेत. कामिकाजे ड्रोनच वैशिष्टय म्हणजे GPS चालत नाहीत, अशा ठिकाणी सुद्धा ही ड्रोन्स काम करतात. इस्रोने विकसित केलेली NAVIC सिस्टिम या ड्रोन्समध्ये आहे. त्यामुळे GPS सिग्नल जॅम असलेल्या भागात सुद्धा ही ड्रोन्स आपलं काम अचूकतेने करतात.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.