बापरे! ब्लॅक, व्हाईट फंगसपेक्षाही ‘येलो फंगस’ अधिक धोकादायक; उत्तर प्रदेशात सापडला पहिला रुग्ण
धीच कोरोनाचं संकट असताना त्यात ब्लॅक फंगसच्या आजाराने विळखा घातला. त्यानंतर लगेच व्हाईट फंगसनेही थैमान घातले. (After white and black, now yellow fungus is here, Ghaziabad reports first case)
गाझियाबाद: आधीच कोरोनाचं संकट असताना त्यात ब्लॅक फंगसच्या आजाराने विळखा घातला. त्यानंतर लगेच व्हाईट फंगसनेही थैमान घातले. आता येलो फंगसने दस्तक दिली आहे. उत्तर प्रदेशात येलो फंगसचा पहिला रुग्णही सापडला आहे. ब्लॅक फंगस आणि व्हाईट फंगसपेक्षा येलो फंगस अधिक धोकादायक आणि खतरनाक असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं असून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. (After white and black, now yellow fungus is here, Ghaziabad reports first case)
या येलो फंगसला म्युकोर सेप्टिकस हे नाव देण्यात आलं आहे. येलो फंगस आढळून आलेला रुग्ण गाझियाबादचा राहणारा आहे. 34 वर्षाच्या या तरुणाला आधी कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्याला मधुमेहाचाही त्रास आहे. ईएनटी सर्जन डॉक्टर बृज पाल त्यागी त्याच्यावर उपचार करत आहेत.
येलो फंगसची लक्षणे
येलो फंगस हा एक घातक आजार आहे. हा शरीरांतर्गत सुरू होतो. सुस्ती येणे, कमी भूक लागणे, जेवणावर अजिबात वासना न होणं, वजन कमी होणं आदी या आजाराची लक्षणे आहेत. हा फंगस जसजसा वाढतो, तसतसा अधिक घातक होतो. या फंगसची लागण झालेली असल्यास आणि अंगावर जखम असल्यास त्यातून पाण्याचा स्त्राव होतो. तसेच या फंगसची लागण झालेल्यांची जखम अत्यंत धीम्यागतीने बरी होते.
येलो फंगसवरील उपचार
हा आजार अत्यंत गंभीर आणि धोकादायक आहे. भूक न लागणे, वजन कमी होणे आणि सुस्ती येणे आदी लक्षणे जाणवल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार करून घ्या. सध्या तरी या आजारावर amphoteracin b हे इंजेक्शन उपयुक्त आहे. हे इंजेक्शन ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीफंगल आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे.
येलो फंगस का होतो?
अनहायजीनमुळे येलो फंगस होतो. त्यामुळे घराच्या आसपास स्वच्छता ठेवा. स्वच्छतेमुळे बॅक्टेरिया आणि फंगसच्या उत्पत्ती आणि विकासाला रोखण्यात मदत होते. शिळं अन्न घरात दीर्घकाळ ठेवू नका. शिळं अन्न किंवा खाद्यपदार्थ अधिक काळ ठेवल्यास हा आजार फोफावण्याची शक्यता असते, असं सूत्रांनी सांगितलं.
बचाव कसा कराल?
येलो फंगसच्या वाढीसाठी घरातील आद्रता ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. अधिक आद्रता आणि बॅक्टेरिया फंगसच्या वाढीला उपयुक्त ठरतो. घरातील आद्रता साधारण 30 ते 40 टक्के असावी. त्यामुळे हा व्हायरस निर्माण होत नाही. पाण्याच्या टाकीतही येलो फंगची वाढ होण्याची शक्यता असते, असं सूत्रांनी सांगितलं. (After white and black, now yellow fungus is here, Ghaziabad reports first case)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | SuperFast 100 News | 8 AM | 24 May 2021 https://t.co/J5c5kK2nlP #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 24, 2021
संबंधित बातम्या:
Maharashtra Coronavirus LIVE Update : कोव्हिड नियमांचं उल्लंघन केल्यानं सासवडमधील तीन हॉटेल सील
बापरे! कोरोना नसतानाही ब्लॅक फंगस होतो?; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात
(After white and black, now yellow fungus is here, Ghaziabad reports first case)