बहुमतचाचणी आधी बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग, लालूंनी सर्व आमदारांना आपल्या घरीच थांबवले

Bihar Politics : बिहारच्या राजकारणात सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. नितीशकुमार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याने इंडिया आघाडीला मोठा धक्का बसला आहे. बिहारमध्ये १२ फेब्रुवारी रोजी बहुमत चाचणी होणार आहे. त्याआधी लालू यादव हे देखील अॅक्टिव्ह झाले आहे. आमदार फुटू नये म्हणून त्यांनी एकाच ठिकाणी सगळ्यांना ठेवले आहे.

बहुमतचाचणी आधी बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग, लालूंनी सर्व आमदारांना आपल्या घरीच थांबवले
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 8:28 PM

पाटणा : बिहारच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव सक्रिय झाले आहेत. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आरजेडीसोबतची साथ सोडून पुन्हा एकदा भाजपसोबत सत्ता स्थापन केली आहे. आता त्यांच्या नव्या सरकारची बहुमतचाचणी पार पडणार आहे. त्याआधी राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत. लालू यादव यांनी आरजेडीच्या सर्व आमदारांना तेजस्वी यादव यांच्या शासकीय निवासस्थानी थांबवले आहे. आमदारांच्या वस्तू त्यांच्या घरुन मागवण्यात आले आहेत.

बहुमतचाचणी कधी होणार?

बिहारमध्ये १२ फेब्रुवारीला फ्लोर टेस्ट होणार आहे. जेडीयूने 11 फेब्रुवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. यात जेडीयूच्या सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. बिहारमधील काँग्रेसच्या आमदारांना हैदराबादला पाठवण्यात आले आहे. आमदार फुटू नये म्हणून काँग्रेसने हा निर्णय घेतला आहे.

जीतनराम मांझीही चर्चेत

फ्लोअर टेस्टच्या आधी बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. हिंदुस्थान अवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांना आणखी एक मंत्रीपद हवे आहे. त्यांना आरजेडीकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयावर सगळा खेळ असणार आहे. फ्लोर टेस्टपूर्वी त्यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, ते गरीब आहेत पण धोकेबाज नाही.

कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत?

विधानसभेच्या जागा: 243

आरजेडी: ७९ आमदार काँग्रेस : १९ आमदार CPI(M-L)+CPI+CPI(M): १६ आमदार

विरोधकांकडे एकूण संख्याबळ : ११४ आमदार AIMIM : १

नितीश कुमार यांच्याकडे किती आमदार

भारतीय जनता पक्षाचे ७८

जनता दल युनायटेडचे ​​४५

हिंदुस्थान अवाम मोर्चा  ४

अपक्ष आमदार १

एकूण आमदार १२८

इंडिया आघाडीला धक्का

भाजपने लोकसभा निवडणुकीआधी एनडीएमधील जुन्या सहकारी मित्र पक्षांना पुन्हा एकदा जवळ करण्याची तयारी सुरु केली आहे. प्रत्येक राज्यातील प्रादेशिक पक्षांना आपल्या सोबत घेण्यासाठी भाजपने एक कमिटी स्थापन केली आहे. त्यामुळे विरोधक ही चिंतेत आहे. कारण नितीश कुमार यांनी सोबत घेऊन त्यांनी इंडिया आघाडीला पहिली सुरुंग लावला आहे.

दुसरीकडे काँग्रेसला भीती आहे की, भाजप त्यांच्या आमदारांना देखील फोडू शकते. त्यामुळे काँग्रेसने 14 आमदारांना तेलंगणामध्ये हलवले आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.