कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता नाही; एम्सने डब्लूएचओचा दावा फेटाळला
जागतिक आरोग्य संघटना (WHO) कडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र एम्सकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याचे खंडण करण्यात आले आहे.
नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटना (WHO) कडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मात्र एम्सकडून जागतिक आरोग्य संघटनेच्या इशाऱ्याचे खंडण करण्यात आले आहे. एम्सचे डॉक्टर आणि आरोग्यतज्ज्ञ असलेल्या डॉ. संजय रॉय यांनी याबाबत बोलताना सांगितले की, भारतामध्ये कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट येऊ गेली आहे. या काळात कोट्यावधी लोक कोरोनाबाधित झाले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये अॅन्टीबॉडी तयार झाल्या आहेत, तसेच लसीकरणाला देखील वेग आल्याने भारतामध्ये तिसऱ्या लाटेची शक्यता नाही. जगभरातील कोरोनाचा प्रादुर्भाव हळहळू कमी होत आहे. मात्र तरी देखील नागरिकांनी कोरोनाचे नियम पाळावेत, नियमांचे उल्लंघन केल्यास कोरोनाचे तिसरी लाट येऊ शकते. याचा सर्वाधिक धोका हा मध्य अशिया आणि युरोपला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यास जगभरात आणखी पाच लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो असा इशारा डब्लूएचओकडून देण्यात आला होता.
मोठ्या लाटेची शक्यता कमी
याबाबत बोलताना एम्सचे डॉक्टर रॉय यांनी म्हटले आहे की, जेव्हा एखाद्या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव एखाद्या मानवी समूहावर मोठ्या प्रमाणात होतो, त्यानंतर जेव्हा तो कमी होतो अथवा नष्ट होतो त्याच्यानंतर पुन्हा एकदा मोठी लाट येण्याची शक्यता जवळपास नसते. कारण अशा समुहामध्ये त्या आजाराविरोधात लढणाऱ्या अॅन्टीबॉडी तयार झालेल्या असतात. तसेच आता लसीकरणामध्ये देखील वाढ होत असून वाढत्या लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. मात्र तरी देखील जागतिक आरोग्य संघटनेच्या दाव्यानुसार पुढील महिन्याच्या फेब्रुवारीपर्यंत मृत्यूचे प्रमाण काही अंशी जास्त राहू शकते असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.
‘वादग्रस्त वक्तव्य करू नयेत’
यावेळी बोलताना त्यांनी जागतिक आरोग्य संघटनेवर टीका करताना म्हटले आहे की, जागतिक स्तरावर डब्लूएचओने आपली विश्वासहार्यता गमावली आहे. कोरोनाबाबत अनेकवेळा जागतिक आरोग्य संघटनेकडून वादग्रस्त वक्तव्य करण्यात आली आहेत. डब्लूएचओला गेल्या दीड वर्षात देखील कोरोनावर कायमस्वरूपी परिणामकारक औषध शोधण्यात यश आलेले नाही. त्यामुळे असे वादग्रस्त वक्तव्य करणे टाळले पाहीजे.
Corona update: गेल्या 24 तासांमध्ये देशात 10,929 नवे कोरोनाबाधित; 392 जणांचा मृत्यूhttps://t.co/QfaQabllDa#coronavirus #COVID19 #Corona #CoronavirusUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 6, 2021
संबंधित बातम्या
सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांना पेट्रोल-डिझलचे दर कमी करायला सांगावेत: भाजप
VIDEO | दिवाळीनिमित्त फटाके आणायला गेला चिमुकला अन् स्फोटात जीव गमावून बसला; वाचा नेमके काय घडले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबरमध्ये नेपाळ दौऱ्यावर जाणार?; चौथ्या दौऱ्यात लुम्बिनीलाही भेट देणार