मोठी बातमी! तामिळनाडूत एअर इंडियाच्या विमानात हवेत तांत्रिक बिघाड, प्लेनच्या बराच वेळ हवेतच चकरा, अखेर…

तामिळनाडू येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. तामिळनाडूच्या त्रिची विमानतळाहून यूएई देशातील शारजाह शहरात जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाण केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान त्रिची विमानतळाजवळच हवेतच फिरत होतं. अखेर या विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यात यश आलं आहे.

मोठी बातमी! तामिळनाडूत एअर इंडियाच्या विमानात हवेत तांत्रिक बिघाड, प्लेनच्या बराच वेळ हवेतच चकरा, अखेर...
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 8:47 PM

तामिळनाडू येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. तामिळनाडूच्या त्रिची विमानतळाहून यूएई देशातील शारजाह शहरात जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाण केल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे हे विमान त्रिची विमानतळाजवळच हवेतच फिरत होतं. या विमानात हायड्रोलिक फेल झालं होतं. त्यामुळे विमानाचे चाकं आतमध्ये जाण्यास अडचणी येत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी विमानातील इंधन कमी केलं जात होतं. त्यासाठी विमानाला हवेतच फिरवलं जात होतं. विमानातील झालेल्या बिघाडाच्या पार्श्वभूमीवर त्रिची विमानतळावर प्रशासन सज्ज झालं. त्रिची विमानतळावर जवळपास 20 पेक्षा जास्त रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. या विमानात 141 प्रवासी होते. अखेर या विमानाची आता इमर्जन्सी लँडिंग करण्यात यश आलं आहे.

विमानाने उड्डाण केल्यानंतर त्याची चाके आतमध्ये गेली नाहीत. चाकं आतमध्ये जाण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे विमानाला पुढील ऑपरेशनल समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे अधिकाऱ्यांनी विमानातील इंधन संपवून उतरविण्याची योजना आखली. इंधनाने भरलेल्या विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगवेळी अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे इंधन संपवून विमानाची सुखरुप लँडिंग करण्यात आली. विमानाच्या इमर्जन्सी लँडिंगची माहिती मिळाल्यानंतर अनेक रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्याही विमानतळावर तैनात करण्यात आल्या होत्या. मात्र, विमान विमानतळावर सुखरूप उतरले ही दिलासादायक बाब आहे.

नेमकं काय घडलं?

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या विमानाने संध्याकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी त्रिची विमानतळाहून उड्डाण केलं होतं. हे विमान शारजाहला जात होतं. टेक ऑफनंतर विमानाचे चाकं मोडून आतमध्ये घेणारं हायड्रॉलिक फेल झालं. त्यानंतर पायलटने तातडीने याबाबतची माहिती संबंधित प्रशासनाला दिली. यावेळी निर्णय घेण्यात आला की, जोपर्यंत विमानातील पूर्ण इंधन संपत नाही, फक्त लँडिंग करण्याइतपत इंधन शिल्लक राहत नाही तोपर्यंत विमानाला हवेतच ठेवावं. त्यामुळे विमान बराच वेळ आकाशात फिरत राहिलं. अखेर विमानातील इंधन कमी झाल्यानंतर इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेण्यात आला.

नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.