‘माझ्या बॅगेत बॉम्ब…’, Air India च्या प्रवाशाला विमानतळावर अटक, काय आहे प्रकरण?
Air India: प्रवासी म्हणाला 'माझ्या बॅगेत बॉम्ब...', भारतातील 'या' विमानतळावर माजली सर्वत्र खळबळ... नक्की काय आहे प्रकरण? घ्या जाणून, सध्या सर्वत्र प्रकरणाची चर्चा...
विमानतळावरुन कायम चांगल्या किंवा धक्कादायक बातम्या समोर येत असतात. आता देखील विमानतळावरील एक मोठी माहिती समोर येत आहे. एअर इंडियाच्या (Air India ) एका प्रवाशाला कोची विमानतळावर अटक करण्यात आली. मनोज कुमार असे या प्रवाशाचे नाव आहे. मनोज कुमार यांना एअर इंडियाच्या विमानाने (AI 682) कोचीहून मुंबईला जायचं होतं. एक्स-रे बॅगेज इन्स्पेक्शन सिस्टीम चेकपॉईंटवर तपासणी करत असताना मनोजने सीआयएसएफ अधिकाऱ्याला विचारले, माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का? मनोजच्या या वक्तव्यामुळे तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांचा तणाव वाढला आणि विमानतळावर एकच खळबळ माजली…
कोची विमानतळाने या प्रकरणाची संपूर्ण माहिती देणारं निवेदन जारी केलं आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार, सुरक्षा तपासणीदरम्यान मनोज कुमार यांनी सीआयएसएफ अधिकाऱ्याला विचारले, माझ्या बॅगेत बॉम्ब आहे का? या विधानामुळे चिंता निर्माण झाली आणि विमानतळ सुरक्षा पथकाने त्वरित कारवाई करण्यास सुरुवाक केली. अधिकाऱ्यांनी तात्काळ बॉम्ब शोधक आणि निकामी पथक (BDDS) बोलावलं.
बीडीडीएसने प्रवाशांच्या केबिनची तपासणी करून त्याच्या संपूर्ण सामानाची देखील तपासणी केली. आवश्यक तपास केल्यानंतर पोलिसांनी प्रवाशी मनोज कुमार याला पुढील तपासासाठी स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिलं आणि एअर इंडियाचे विमान ठरल्याप्रमाणे निघाले.
Kerala: A passenger, Manoj Kumar (42), who was scheduled to fly from Kochi (COK) to Mumbai (BOM) on Air India flight AI 682, was arrested this morning at Cochin International Airport for making an ‘alarming comment’ to a CISF officer at the X-ray Baggage Inspection System (XBIS)…
— ANI (@ANI) August 11, 2024
सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून विमानांमध्ये बॉम्बची धमकी, विमानतळावर बॉम्बच्या अफवा यासारख्या बातम्या रोज येत असतात. या बातम्यांमुळे विमानतळावर खळबळ माजते आणि प्रवाशांच्या मनात भीती निर्माण होते. अशात अधिकांऱ्यांवरील तणाव देखील वाढतो.
काही दिवसांपूर्वी ‘इंडिगो’च्या विमात बॉम्ब असल्याची सुचना मिळाली होती. त्यामुळे विमात असलेल्या प्रवाशांमध्ये खळबळ माजली… याच कारणामुळे संपूर्ण विमान रिक्त करण्यात आला. विमान लखनऊहून अबुधाबीला जाणार होते. विमानाच्या टॉयलेटजवळ कोणीतरी बॉम्ब लिहून ठेवलं होतं.
टॉयलेटजवळ बॉम्ब लिहिल्याची माहिती मिळताच केबिन क्रूने एटीसीला माहिती दिली. विमान तातडीनं रिकामं करण्यात आलं. अखेर तपास केल्यानंतर बॉम्ब असल्याची फक्त अफवा असल्याची माहिती समोर आली… अशा घटना कायम घडत असतात.