ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यासाठी ‘चाणक्य’नीती, अजित डोभाल मैदानात उतरण्याची चिन्हं

अजित डोभाल आणि चीनमधील त्यांचे समकक्ष वांग यी यांच्यात चर्चा होईल. वांग यी सध्या चीनचे परराष्ट्र मंत्री तसेच राज्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत.

ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्यासाठी 'चाणक्य'नीती, अजित डोभाल मैदानात उतरण्याची चिन्हं
Follow us
| Updated on: Jul 06, 2020 | 12:14 PM

नवी दिल्ली : भारत आणि चीनमधील सीमावाद आठ आठवड्यांपासून धुमसतच आहे. या वादामध्ये भारताने आर्थिक आणि मुत्सद्दी आघाडीवर चिनी ड्रॅगनला प्रचंड मोठे झटके दिले आहेत. मात्र कुरापती सुरुच असल्याने चिनी सैन्याला मागे हटवण्यासाठी मोदी सरकार राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांना मैदानात उतरवण्याची चिन्हं आहेत. (Ajit Doval may hold Special Representative Talks with China on Ladakh Stand off)

चीनची डोकेदुखी कमी करण्याची जबाबदारी अजित डोभाल यांच्यावर सुपूर्द केली जाण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला अनेकदा धोबीपछाड देणाऱ्या डोभाल यांना चिनी ड्रॅगनला मागे हटवण्याची नवी जबाबदारी मिळणार आहे. विशेष प्रतिनिधी (Special Representative – एसआर) चर्चेद्वारे सरकार सीमाप्रश्न सोडवण्याचा विचार करत आहे. ‘नवभारत टाईम्स’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

अजित डोभाल आणि चीनमधील त्यांचे समकक्ष वांग यी यांच्यात चर्चा होईल. वांग यी सध्या चीनचे परराष्ट्र मंत्री तसेच राज्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. राज्य सल्लागार पदाची ताकद परराष्ट्रमंत्र्यांपेक्षा जास्त आहे. सरकारला विश्वास आहे की या चर्चेद्वारे चिनी सैन्याला माघार घेण्यास उद्युक्त केले जाऊ शकते.

हेही वाचा : इतिहास साक्षी आहे, विस्तारवाद नेहमीच नष्ट झालाय, पंतप्रधान मोदींचा चीनला थेट इशारा

डोभाल आधीपासूनच लडाखच्या परिस्थितीवर सक्रीय आहेत. चीनच्या सर्व कृत्यांवरही ते नजर ठेवून आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अचानक लडाखला जाण्याची योजना डोभाल यांच्या रणनीतीचा भाग मानली जाते. डोभाल यांच्या योजनेची कोणालाही माहिती नव्हती.

दुसरीकडे, चीनच्या घुसखोरीच्या प्रयत्नांनंतर भारताने ज्या पद्धतीने आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे, तीही डोभाल यांची रणनीती असल्याचे म्हटले जाते.

सीमेवर दोन्ही देशांमध्ये लष्करी कमांडर-स्तरीय चर्चा देखील सुरु आहेत. परराष्ट्र मंत्र्यांमध्येही वाटाघाटी सुरु आहेत, पण आता भारताला ही चर्चा आणखी उच्च स्तरावर नेण्याची इच्छा आहे.

हेही पहा : TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

2017 पर्यंत, चीनमध्ये परराष्ट्रमंत्री आणि राज्य सल्लागार ही भिन्न पदे होती. परंतु 2018 नंतर दोन्ही पदांवर एकच व्यक्ती आहे. 2017 मध्ये, जेव्हा डोकलाम वाद झाला, तेव्हा यांग जिएची राज्य सल्लागार होते. चीनने त्यांना विशेष प्रतिनिधी बनवले होते.

(Ajit Doval may hold Special Representative Talks with China on Ladakh Stand off)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.