Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार राष्ट्रवादीतच, पण राजकारणात काहीही होऊ शकतं; संजय राऊत यांचं सूचक विधान

शरद पवारांशी काल दोन ते तीनवेळेस मी बोललो. बेळगावात मी प्रचार करत आहे. बेळगावातील निवडणूक प्रचाराबाबतची ते माहिती घेत होते. बाकी इतर बोलणं झालं नाही, असं संजय राऊत म्हणाले.

अजित पवार राष्ट्रवादीतच, पण राजकारणात काहीही होऊ शकतं; संजय राऊत यांचं सूचक विधान
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: May 04, 2023 | 10:31 AM

बेळगाव : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीतील घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय होईल? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार काय भूमिका घेणार याबाबतचीही चर्चा सुरू आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींवर भाष्य केलं आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीतच राहतील असं संजय राऊत म्हणाले. मात्र, राजकारणात काहीही घडू शकतं, असं सूचक विधानही राऊत यांनी केलं. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

संजय राऊत हे कर्नाटकात निवडणूक प्रचारासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील घडामोडींवर भाष्य केलं. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपसोबत जाण्याबाबतच्या चर्चा आहेत, असं राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर, अजित पवारांची चर्चा बाहेर आहे. त्यावर मी सामनातून भाष्य केलं आहे. मी कुठेही जाणार नाही. मी शेवटच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादीतच राहीन,असं अजित पवार वारंवार सांगत आहेत. त्यांच्याविषयीच्या अफवांना पूर्णविराम दिला पाहिजे. अजित पवार आणि त्यांचं कुटुंब एक नातं आहे. पण राजकारण वेगळं असतं. राजकारणात कधी काय घडेल हे सांगताय येत नाही, असं संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

जबाबदाऱ्या पेलणं, ती ताकद असणं…

अजित पवार महाष्ट्रात स्थिर आहेत. ते नेते आहेत. सुप्रिया सुळे यांना मी राष्ट्रीय स्तरावर काम करताना पाहतो. त्या उत्तम काम करत आहेत. संसदेतील त्यांचा परफॉर्मन्स उत्तम आहे. पण संसदेती परफॉर्मन्स आणि राष्ट्रीय अध्यक्षपद स्वीकारल्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या त्या पेलणं ती ताकद असणं यात खूप फरक असतो. शरद पवारांना 60 ते 65 वर्षाचा अनुभव आहे. त्यामुळे ते राष्ट्रीय स्तरावर गेले, असं राऊत यांनी सांगितलं.

तो त्यांचा अंतर्गत निर्णय

राष्ट्रवादीतील घडामोडींवर ‘सामना’त फार जपून भाष्य केलं आहे. राष्ट्रवादीतील घडामोडीमुळे महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालं आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण व्हावा हा त्यांचा अंतर्गत निर्णय आहे. अध्यक्ष कोण व्हावा याचा निर्णय घ्यायला त्यांचे नेते सक्षम आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

तुलना होऊच शकत नाही

शरद पवार असतील किंवा बाळासाहेब ठाकरे असतील किंवा इंदिरा गांधी हे टोलेजंग नेते आहेत. जेव्हा त्यांच्या घरातून कोणी वारसदार येतात तेव्हा त्यांना ती उंची गाठता येत नाही. कारण हे नेते महान व्यक्तीमत्त्व असतात. पण आम्ही त्यांची तुलना त्यांच्या वडिलांशी करतो. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांची तुलना होऊच शकत नाही, असंही ते म्हणाले.

त्यात पडणं योग्य नाही

शरद पवारांना मी व्यक्तीश: नेहमी भेटत असतो. त्यांना भेटण्यात काही अडचण नसते. त्यांनी घेतलेले निर्णय हे त्यांच्या राजकारणातील भूमिकांविषयी असू शकतात. पक्षातील धोरणांविषयी असू शकतात. अशावेळी बाहेरच्या व्यक्तीने बाहेर पडणं ते योग्य नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.