Ajmer Sharif Dargah Temple Row : अजमेरच्या दर्ग्यात मंदिराचा दावा, कोण आहेत संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती?

Ajmer Sharif Dargah Temple Row : उत्तर प्रदेशच्या संभलमधील जामा मशिदीनंतर आता राजस्थानच्या अजमेरमधील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्याची चर्चा आहे. जामा मशिदीनंतर आता या दर्ग्याच्या सर्वेचा आदेश दिला जाऊ शकतो. सध्या सुरु असलेल्या चर्चेच्या निमित्ताने हे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती कोण होते? ते कुठून आलेले? हा सर्व इतिहास काय आहे? त्या बद्दल जाणून घेऊया.

Ajmer Sharif Dargah Temple Row : अजमेरच्या दर्ग्यात मंदिराचा दावा, कोण आहेत संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती?
Ajmer Sharif Dargah
Follow us
| Updated on: Dec 02, 2024 | 11:28 AM

उत्तर प्रदेशच्या संभलमध्ये जामा मशिदीच्या सर्वेवरुन मोठा वाद झाला. हिंसाचार झाला. काही जणांचा मृत्यू झाला. आता जामा मशिदीनंतर राजस्थानच्या अजमेर येथील ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती दर्गा चर्चेत आला आहे. जामा मशिदीनंतर आता अजमेर दर्ग्याच्या सर्वेचा आदेश दिला जाऊ शकतो. अजमेर शरीफ दर्गा बनण्याआधी तिथे हिंदू मंदिर होतं, असा दावा करण्यात आला आहे. तशी याचिका राजस्थानातील एका सत्र न्यायालयाने स्वीकारली आहे. हिंदू सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांनी ही याचिका दाखल केली आहे. दर्ग्याच्या जागी आधी शिव मंदिर होतं, असा दावा त्यांनी केला आहे. अजमेरचा हा दर्गा सगळ्या भारतात प्रसिद्ध आहे. अनेक नामवंत राजकीय नेते, सेलिब्रिटी या दर्ग्याला भेट देऊन ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचं दर्शन घेतात. हे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती कोण होते? ते कुठून आलेले? हा सर्व इतिहास काय आहे? त्या बद्दल जाणून घेऊया.

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे पर्शिया आताच्या इराणमधून भारतात आले. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे फारसी वंशाचे सुन्नी मुस्लिम तत्वज्ञानी आणि विद्वान होते. ते गरीब नवाज आणि सुल्तान-ए-हिंद नावाने सुद्धा ओळखले जायचे. 13 व्या शतकात ते भारतीय उपखंडात पोहोचले. पूजनीय धार्मिक व्यक्तीच्या कबरीवर दर्गा बांधला जातो. बहुतांश सुफी संतांचे दर्गे आहेत. त्यातला एक दर्गा अजमेर येथे आहे. उपखंडात सुफीजमचा प्रचार, प्रसार करण्यात ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांची महत्त्वाची भूमिका होती. हा दर्गा इंडो-इस्लामिक वास्तुकलेचा अद्भुत नमुना आहे.

हा भाग इराणच्या दक्षिण-पूर्वेला

सूफी संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा जन्म इसवी सन 1143 मध्ये पर्शिया म्हणजे आताच्या इराणमधील सिस्तान भागात झाला. आता हा भाग इराणच्या दक्षिण-पूर्वेला आहे. सिस्तानचा प्रदेश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेलगत आहे. असं म्हटलं जातं की, ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या वडिलांचा चांगला व्यवसाय होता. पण त्यांचं मन अध्यात्माममध्ये जास्त रमायचं. त्यांनी वडिलांचा व्यवसाय सोडून अध्यात्माचा मार्ग स्वीकारला.

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती कोणाचे शिष्य?

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांनी संसारिक मोह-मायेचा त्याग केला व अध्यात्मिक प्रवास सुरु केला. या प्रवासात त्यांची भेट प्रसिद्ध संत हजरत ख्वाजा उस्मान हारूनी यांच्याशी झाली. हजरत ख्वाजा उस्मान हारूनी यांनी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांना आपलं शिष्य बनवलं. त्यांना दीक्षा दिली. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांना वयाच्या 52 व्या वर्षी शेख उस्मान यांच्याकडून खिलाफत मिळाली. त्यानंतर ते हज यात्रेसाठी मक्का आणि मदीनाला गेले. तिथून मुल्तान मार्गे भारतात आले.

हिंदू विचारवंतांसोबत चर्चा

अफगाणिस्तानमध्ये फिरत असताना कुतूबुद्दीन बख्तीयार काकी हे ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचे पहिले अनुयायी बनले. कुतूबुद्दीनसह ख्वाजा मोइनुद्दीन मुल्तान येथे गेले. तिथे ते पाच वर्ष राहिले. संस्कृत भाषेचा त्यांनी अभ्यास केला. हिंदू विचारवंतांसोबत चर्चा केली. तिथून लाहोरला आले.

अजमेरमध्ये स्थायिक

भारतात आल्यानंतर ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरमध्ये स्थायिक झाले. तिथे त्यांनी उपदेश, प्रवचनाच कार्य सुरु केलं. इसवी सन 1192 मध्ये मुईजुद्दीन मुहम्मद बिन साम (मुहम्मद गोरी) ने तराइनच्या दुसऱ्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांना हरवलं आणि दिल्लीमध्ये आपल शासन स्थापित केलं. आध्यात्मिक ज्ञान मार्ग दाखवणाऱ्या ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या प्रवचनांनी सर्वसामान्य प्रभावित झाले. योग्य मार्ग दाखवणाऱ्या त्यांच्या प्रवचानांची स्थानिकांप्रमाणेच दूरदूरचे राजे, श्रीमंत व्यक्ती, शेतकरी, गरीब वर्ग त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागला.

Ajmer Sharif

गरीब नवाज हा किताब मिळाला

लाहोरमधून मोइनुद्दीन चिश्ती दिल्लीला आले. तिथून मग अजमेरला गेले. मोइनुद्दीन चिश्ती अजमेरला आले, तेव्हा त्यांचं वय 50 च्या आसपास होतं. इसवी सन 1192 मध्ये मुईजुद्दीन मुहम्मद बिन साम (मुहम्मद गोरी) ने तराइनच्या दुसऱ्या युद्धात पृथ्वीराज चौहान यांना हरवलं. चौहान यांची सत्ता संपुष्टात आली. राजस्थान जिंकल्यानंतर मुहम्मद गोरीच्या फौजेने उत्पात सुरु केला. नासधूस, हिंसाचार, रक्तपास सुरु होता. अजमेरमध्ये मोठं नुकसान झालं होतं. अजमेरची स्थिती पाहून मोइनुद्दीन चिश्ती यांनी लोकांच्या मदतीसाठी तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तिथेच वास्तू उभारली व लोकांना मदत करण्यास सुरुवात केली. ज्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं, अन्न नव्हतं. मोइनुद्दीन चिश्ती यांच्यामुळे त्या सगळ्यांना या गोष्टी मिळाल्या. त्यांचा दिलदारपणा, निस्वार्थी वृत्तीमुळे त्यांना मोइनुद्दीन म्हणजे गरीब नवाज हा किताब मिळाला.

कुठल्या मुगल बादशाहने कबर बनवली?

इसवी सन 1236 ची ही गोष्ट आहे. ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या निधनानंतर अजमेरमध्ये त्यांचा दफनविधी झाला. मुगल बादशाह हुमायूंने त्यांची कबर बनवली. आता तिचं कबर दरगाह ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेर शरीफ दर्गाच्या नावाने प्रसिद्ध आहे. ख्वाजांच्या अनुयायांसाठी हा दर्गा म्हणजे खूप पवित्र स्थळ आहे. भारतातूनच नाही, तर जगभरातून लोक ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तींच्या दर्ग्यामध्ये दर्शनासाठी येतात.

कुठले मुगल शासक दर्ग्यावर दर्शनासाठी आले?

बडोद्याच्या तत्कालीन महाराजांनी दरगा शरीफच्या वर एक सुंदर आवरण बनवलेलं. त्यानंतर मुगल शासक जहांगीर, शाहजहां आणि जहांआराने या दर्ग्याचा जीर्णोद्धार केला. मुहम्मद बिन तुगलक, हुमायूं, शेरशाह सूरी, अकबर, जहांगीर, शाहजहां, दारा शिकोह ते औरंगजेबपर्यंत शासक या दर्ग्यावर दर्शनासाठी आले होते, असं इतिहासकार सांगतात.

पुण्यतिथीच्या दिवशी उत्सव का?

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या पुण्यतिथीला दरवर्षी दर्ग्यामध्ये ऊर्स साजरा केला जातो. पुण्यतिथीला शोक व्यक्त करण्याऐवजी उत्सवाच आयोजन होतं. असं यासाठी कारण, ख्वाजाच्या अनुयायींच असं म्हणणं आहे की, या दिवशी मुर्शीद म्हणजे शिष्य देवाला भेटतो.

मोहम्मद गोरीच्या विजयानंतर भेट स्वीकारण्यास नकार

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्यामुळे भारतात चिश्ती सिलसिलेची स्थापना झाली. हा सिलसिला ईश्वरासोबत एकरुपता (वहदत अल-वुजुद) सिद्धांतावर जोर देतो. या सिलसिल्याचे लोक शांतताप्रिय असतात. संसारिक सुखामुळे माणसाचा ईश्वराशी एकरुप होण्यापासूनचा मार्ग भरकटतो, असं या सिलसिल्याचा म्हणणं आहे. असं म्हणतात की, मोहम्मद गोरीच्या विजयानंतर त्याच्याकडून कुठलीही भेट स्वीकारण्यास ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांनी मनाई केली होती

लोकांना समानतेची, प्रेमाची शिकवण

भारतीय उपखंडात अनेक राजकीय उलथापालथी सुरु होत्या. इस्लामिक शासकांकडून हल्ले सुरु होते. त्यावेळी ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती हे पंथांच्या सीमा ओलांडून लोकांना समानतेची, प्रेम आणि माणुसकी जपण्याची शिकवण देत होते.

नरेंद्र मोदी दरवर्षी या दर्ग्यासाठी चादर पाठवतात

ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यात दर्शनासाठी रोज हजारोंच्या संख्येने लोक येत असतात. पुढच्यावर्षी जानेवारी महिन्यात 813 वा उर्स साजरा केला जाईल. मुगल शासक सम्राट अकबरला ख्वाजा अजमेर शरीफच्या दर्ग्याशी खूप लगाव होता. अजमेर शरीफचा दर्गा एक पवित्र सुफी स्थळ आहे. भारतातूनच नाही जगातून लोक इथे दर्शनासाठी येतात. फक्त सांस्कृतिक, ऐतिहासिकच नाही, तर राजकीय दृष्टीकोनातून सुद्धा हे खूप महत्त्वपूर्ण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी या दर्ग्यासाठी चादर पाठवतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणालेले?

मार्च 2016 साली वर्ल्ड सुफी फोरमच आयोजन झालं होतं. यात 20 देशांचे प्रतिनिधी सहभागी झालेले. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा सहभागी झालेले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, “ख्वाजा मोइनुद्दीन चिश्तींच्या शब्दात ईश्वराला सर्वात जास्त कुठली पूजा आवडते, तर ती दीन, दु:खी आणि शोषितांची मदत” “सुफीवाद शांतता, करुणा आणि शांततेचा आवाज आहे. सुफीवाद बंधुता सांगतो. सुफीवादाचा संदेश फक्त दहशतवादाशी लढण्यापर्यंत मर्यादीत नाही, तर यात ‘सबका साथ, सबका विकास’ चा मंत्र सुद्धा आहे” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.