Gyanvapi Explainer :आलमगिरी मशीद की गौरी मंदिर, ज्ञानवापीवर जेवढी तोंडं तेवढे दावे, नेमकं काय आहे सत्य ?

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा आहे, तर या मशिदीचे पहिले नाव हे आलमगिरी मशिद असे होते, असा दावा मुस्लीम पक्षकारांकडून करण्यात येतोय. दोन्ही पक्षांच्या काय भूमिका आहेत ते जाणून घेऊयात.

Gyanvapi Explainer :आलमगिरी मशीद की गौरी मंदिर, ज्ञानवापीवर जेवढी तोंडं तेवढे दावे, नेमकं काय आहे सत्य ?
काशी विश्वनाथ मंदिर, ज्ञानवापी मशीदImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 2:15 PM

नवी दिल्ली- वाराणसीज्ञानवापीचं (Gyanvapi mosque)सत्य (Truth)काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्या देशवासियांना आहे. या प्रकरणी प्रत्येक पक्षाचे त्यांचेत्यांचे दावे आहे. याबाबतचा अंतिम निर्णय मात्र कोर्टातच होणार आहे. मंदिरात पूजेची परवानगी मिळावी यासाठी कोर्टाचा दरवाजा हिंदू (Hindu)पक्षकारांनी ठोठावलेला आहे. औरंगजैबाच्या काळात शिव मंदिर तोडून इथे मशीद बांधल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा आहे. स्थानिक कोर्टाच्या सर्वेच्या निर्णयाच्या विरोधा मुस्लीम पक्षकार सुप्रीम कोर्टात गेले आहेत. या सगळ्यात ज्ञानवापी मशिदीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या अंजुमन इंतजामिया कमिटीचे महासचिव अबदुल बातिन नोमानी यांनी वेगळी भूमिका मांडली आहे. ज्ञानवापी मशिदीचे पहिले नाव हे आलमगिरी मशिद असे होते, असा दावा त्यांनी केला आहे. या प्रकरणात सुप्रीम कोर्टात काय भूमिका घेणार याकडेही सगळ्यांचे लक्ष आहे. यात दोन्ही पक्षांच्या काय भूमिका आहेत ते जाणून घेऊयात

औरंगजेबाच्या काळात मशीद होती, आलमगिरी नाव

नोमानी यांनी दावा केला आहे की, ही मशीद अकबराच्या काळापासून आहे. याच्याबाबतचे पुरावे आपल्याकडे आहेत. सध्याचा मशिदीचा ढाचा हा औरंगजैबाने केला होता. मशिदीचे खरे नाव हे आलमगिरी मशीद असे आहे. ज्ञानवापी हा परिसरा गल्ली म्हमून परिचित आहे. वाराणसीच्या पंचगंगा घाटावार आलमगिरी नावाची आणखी एक मशीद अस्तित्वात आहे.

हिंदू पक्षकारांचा काय आहे दावा?

काशी विश्वनाथ धामज्ञानवापी परिसर स्थित गौरी स्वयंभू आदि विश्वेश्वरनाथच्या मंदिरांपैकी एक आहे. इथे पूजेसाठी मंजुरी देण्यात यावी, अशी हिंदू पक्षकारांची मागणी आहे. या परिसरातील सर्व विग्रहांची वसुस्थिती माहित करुन घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. १९९१ साला पूर्वी १८ विग्रहांत नियमित दर्शन, पूजाविधी करण्यात येत होते. आदि विश्वेशर परिसरातील विग्रहांची परिस्थिती आहे तशी राहू द्यावी

हे सुद्धा वाचा

मुस्लीम पक्षकारांचा काय दावा?

मशीद कमिटीच्या याचिकेत वाराणसीत असलेल्या ज्ञानवापी शृंगार गौर परिसरात जैसे थे परिस्थिती ठेवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मशीद प्राचीन काळापासून आहे आणि वाराणसी कोर्टाने दिलेला सर्वेचा आदेश हा पूजास्थळाच्या नियमांच्या विपरीत आहे. १५ ऑगस्ट १९४७ च्या पूर्वी असलेले कोणतेही प्रार्थनास्थळ, दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळात बदलता येणार नाही. स्वातंत्र्य मिळाल्याच्या दिवशी ते ज्या स्थितीत होते, त्याच स्थितीत ते राहायला हवे.

शिवलिंगाबाबत काय दावे?

हिंदू पक्षकारंनी दावा केला आहे की, या परिसरात १२.५० फूट उंचीचे शिवलिंग मिळाले आहे. मुस्लीम पक्षकारांनी हा देवा फेटाळला आहे. मुस्लीम पक्षाचे वकील रईस अहमद यांनी सांगितले की, जे शिवलिंग सांगतायेत, त्यात एक भेग आहे. ही भेग वरपासून खालपर्यंत आहे. कोर्ट कमिश्नरांनी जेव्हा या शिवलिंगात या छेदात काही वस्तू टाकून पाहिली तर ती ३५ इंच आत गेली. शिवलिंगात कधी छिद्र असू शकते का, असा सवालही त्यांनी केला आहे. त्यावर जाणीवपूर्वक छिद्र पाडून शिवलिंग खडित करण्यात आल्याचा हिंदू पक्षकारांचा दावा आहे. शिवलिंग आणि कारंजा यातील फरक आम्हाला माहित आहे, जर कारंजा असेल तर पाण्यासाठीची व्यवस्थाही सापडली असती, पण तसे नाहीये. त्यात काही काड्या टाकून पाहिल्या पण त्या खालपर्यंत गेलेल्या नाहीत.

कुठे आहे ज्ञानवापी मशीद?

ज्ञानवापी मशीद काशी विश्वनाथ मंदिराच्या अगदी बाजूला लागून आहे. काशी विश्वनाथाच्या मुख्य दारातूनच मशिदीत जावे लागते. त्याच्या आजूबाजूला व्यावसायिकांची दुकाने आहेत.

सर्वेचे आदेश कसे आले

८ एप्रिल २०२२ रोजी कोर्टाने कमिश्नर नियुक्त केले. कोर्ट कमिश्नरने १९ एप्रिलला सर्वेची तारीख कोर्टाला सांगितली. १९ एप्रिलला विपक्षी अंजुमन इंतजामिया मसाजिद कमिटीने हायकोर्टात सर्वे रोखण्याची मागणी केली. हायकोर्टाने मागणी फेटाळत, खालच्या कोर्टाचे आदेश तसेच ठेवले. २६ एप्रिल रोजी कोर्टाने ईदनंतर सर्वे सुरु करण्याचे आदेश दिले.

यापूर्वीही सर्वे झाला होता का?

१८ मे १९९६ साली कोर्टाने कोर्ट ममिश्नरची नियुक्ती करुन सर्वे करण्यास सांगितले होते. ठरलेल्या दिवशी दोन्ही पक्षकारांना नोटीस देऊन बोलावलेही होते. वादी पक्षाकडून ५ तर प्रतिवादी पक्षाकडून ५०० जण पोहचले, त्यानंत तणातणी झाली. त्यानंतर कोर्टाने कमिश्नरची कारवाई स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

२६ वर्षांपूर्वीही सापडले होते मंदिराचे भग्नावशेष

ज्ञानवापी मशिदीच्या वाद असलेल्या भागाच्या सर्वेचे प्रकरण नवे नाही. शृंगार गौरीचे नियमित दर्शन आणि आदि विश्वेश्वर परिवाराच्या विग्रहाची परिस्थिती जैसे थे राहण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर कोर्टाच्या आदेशाने झालेल्या सर्वेच्या पूर्वीही, कमिशनच्या कारवाईत मंदिराचे भग्नावशेष सापडल्याचे सत्य समोर आले होते. या विवादित स्थळाची १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्थिती काय होती, याची निश्चिती करण्यासाठी पुरातत्व विभागाला कोर्टाने आदेश दिले होते, मात्र हे प्रकरण हायकोर्टात प्रलंबित आहे.

ज्ञानवापी परिसरात २६ वर्षांपूर्वी १९९६ साली कमिशनची कारवाई

ज्ञानवापी परिसरात २६ वर्षांपूर्वी १९९६ साली कमिशनची कारवाईसिव्हिल जजच्या आदेशाने झाली होती. या कमिशरनच्या कारवाईचा अहवाल कोर्टात सादर करण्यात आला होता. त्यात विवादित स्थळाच्या चारी बाजूंना प्राचीन काळातील बांधकामाचे अवशेष मिळाले आहेत, जे प्राचीन मंदिराचे असल्याचे निरीक्षण स्पष्टपणे मांडण्यात आले होते. पश्चिमेकडे मंदिराच्या भन्वाशेषाचा ढिग आहे, जो मोठ्या चबुतऱ्याच्या रुपात आहे. या भग्नावेषावरच मशिदीचा ढाचाची निर्मिती करण्यात आलेली आहे. पूर्व प्रदिक्षणा मार्गावर हनुमानाची मूर्ती व मंदिर, गंगा देवी आणि गंगेश्वर मंदिरह अस्तित्वात असल्याचे नमूद केलेले आहे.

अयोध्येसारखीच स्थिती?

वाराणसी कोर्टाचा एडवोकेट कमीश्नरकडून सर्वे करण्याचा निर्णय या मैलाचा दगड ठरु शकतो. हा अहवाल अत्यंत महत्त्वाचा आहे. अशीच सुरुवात १९५० साली अयोध्येतही रामजन्मभूमी प्रकरणात झाली होती. फैजाबादमध्ये विवादित स्थळाचा नकाशा तयार करण्यासाठी कोर्टाने कमिश्नर नियुक्त केले होते. हा अहवाल हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातही महत्त्वाचा ठरला. याती निर्णयाचा हा महत्त्वाचा घटक होता. हायकोर्टाच्या आदेशानुसार विवादित स्थळाचे व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी आणि एसएसआय रिपोर्टमध्ये आलेल्या साक्षी या खटल्यातील महत्त्वाचे ठरले होते.

...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.