AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान मोदी किती तास झोपतात? इतके अ‍ॅक्टिव्ह आणि एनर्जेटिक कसे?

पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांचा कामाचा वेग आणि सातत्याने वेगवेगल्या कामांमधील सहभाग यासाठी नेहमीच कौतुक केलं जातं.

पंतप्रधान मोदी किती तास झोपतात? इतके अ‍ॅक्टिव्ह आणि एनर्जेटिक कसे?
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 11:11 PM

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांचा कामाचा वेग आणि सातत्याने वेगवेगल्या कामांमधील सहभाग यासाठी नेहमीच कौतुक केलं जातं. त्यांच्या याच कामातील वेगामुळे त्यांचे समर्थक विरोधी पक्षावरही टीका करत असतात. दररोज नवनव्या गोष्टींमधील त्यांचा उत्साहपूर्वक सहभाग आणि त्यातील त्यांची उर्जा विशेष असल्याचं बोललं जातं. त्यामुळेच पंतप्रधान मोदींच्या या प्रकारच्या कामामागील रहस्य काय? असा प्रश्न विचारला जातो. अनेकजण तर इतके तास काम करणारे पंतप्रधान मोदी किती तास झोपतात असाही प्रश्न विचारतात. याविषयीचाच हा खास रिपोर्ट (All about PM Narendra Modi sleeping hours and schedule).

वयाच्या 70 व्या वर्षात असतानाही पंतप्रधान मोदी अनेक परदेश दौऱ्यांसोबतच देशातही अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होतात. यात विविध योजनांच्या उद्घाटनापासून तर अगदी देशातील विविध राज्यांच्या निवडणुकांच्या प्रचारसभांमध्ये झंझावाती प्रचार करत मोदी आपला दिवस भरगच्च कार्यक्रमांनी सुरु करतात. अगदी रात्री उशिरापर्यंत त्यांचा प्रत्येक तास कोणत्या ना कोणत्या सभा, कार्यक्रम किंवा बैठकीसाठी नियोजित असतो. मात्र, असं असतानाही त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहण्यासारखा असतो.

मोदी किती तास झोपतात?

मोदींचा दिनक्रम विशेष असतो. ते सकाळी किती वाजता उठतात आणि किती वाजता झोपतात याविषयी अनेकांना प्रश्न आहे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत काम करणारे पंतप्रधान मोदी कितीही उशिरा रात्री झोपले तरी पहाटे चार वाजता बिछाना सोडून आपल्या दैनंदिन कामाला सुरुवात करतात. याच विषयी अभिनेता अक्षय कुमारने घेतलेल्या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपला दिनक्रम सांगितला.

या मुलाखतीत मोदींनी आपण दररोज केवळ 3 ते 4 तास झोपत असल्याचं सांगितलं. यावेळी अक्षय कुमारने आश्चर्य व्यक्त केल्यानंतर ते म्हणाले, “मी असं अनेक वर्षांपासून करतो आहे. आता हा माझा दैनंदिन जगण्याचा भाग झालाय. यापेक्षा मी अधिक झोपू शकत नाही. साडे तीन ते चार तास झोपल्यानंतर आपोआप मला जाग येते. त्यानंतर मग माझा दैनंदिन दिनक्रम सुरु होतो.” मोदी दिवसातील 18 तास काम करतात असंही सांगितलं जातं.

योग करण्यापासून दिवसाची सुरुवात

पंतप्रधान मोदींच्या दिवसाची सुरुवात योगाने होते. ते दररोज अर्धा तास योगासन, प्राणायाम आणि सूर्य नमस्कार करतात. सकाळी ते वर्तमानपत्रही वाचतात आणि देशासह जगात काय सुरु आहे त्याचा आढावा घेतात. सकाळी नाश्त्याच्या आधी ते आल्याचा चहा पितात. त्यानंतर त्यांना दिवसभरात चहाची गरज वाटत नाही. मग ते सायंकाळी 4 वाजता चहा पितात. त्यामुळे त्यांना उर्जा मिळते.

हेही वाचा :

मोदींच्या दाढी वाढवण्याचं रहस्य काय?; साडे तीन वर्षे दाढी अशीच ठेवणार?

मोदींना रोज उठून लोकशाहीचे धडे कोण देतंय? वाचा मोदी काय म्हणाले?

‘केंद्र सरकार अडचणीत येतं, तेव्हाच मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकतात’

All about PM Narendra Modi sleeping hours and schedule

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.