गोधरा- गुजरातमध्ये 2002साली झालेल्या दंगलीच्या काळात, बिल्किस बानोवर सामूहिक अत्याचार आणि बानोंच्य़ा कुटुंबीयांतील सात जणांच्या हत्येच्या प्रकरणातील 11 दोषींची आज जेलमधून सुटका करण्यात आली. गुजरात सरकारच्या माफी योजनेतून स्वातंत्र्यदिनी या सगळ्यांची सुटका करण्यात आली आहे. या सगळ्या आरोपींनी 15 वर्षांची शिक्षा पूर्ण केल्यानंतर, सुप्रीम कोर्टात सुटकेसाठी अर्ज दाखल केला होता. सुप्रीम कोर्टाकडूनही त्यांना सोडण्याची स्वीकृती मिळालेली आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टाने 2004 साली या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
All 11 life imprisonment convicts in 2002 Bilkis Bano gang rape case walk out of Godhra sub-jail under Gujarat govt’s remission policy: official
हे सुद्धा वाचा— Press Trust of India (@PTI_News) August 15, 2022
गोधरा प्रकरणानंतर, गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या दंगलीच्या काळात लीमखेडा परिसरात बिल्किस बानों यांच्यावर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली होती. यावेळी त्यांच्या कुटुंबीयातील सात जणांची हत्या करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयने केली होती आणि 11 आरोपींना अटक करुन त्यावेळी मुंबईत आणण्यात आले होते. सीबीआयने या सर्व आरोपींना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या आरोपींना सुरुवातीला मुंबईच्या आर्थर रोडला आणि नंतर नाशिक जेलमध्ये ठेवण्यात आले होते. त्यानंतर 9वर्षांनी त्यांना गोधराच्या जेलमध्ये स्थलांतरीत करण्यात आले होते.
18 वर्षांनंतर तुरुगांतून सुटका झालेल्या एका कैद्याने सांगितले की, आता आम्ही जेलमधून सुटलो तर कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. जेलमध्ये असताना असहाय्य कष्ट आणि अपमानाला सामोरे जावे लागले. आम्ही आमच्या काही चांगल्या मित्रांना आणि कुटुंबीयांनाही पारखे झालो. आमच्यासोबत शिक्षा भोगत असलेले जशूकाका याची पत्नी कॅन्सरने गेली. दुसरा एक आरोपी बिपीन याच्या पायालाही गंभीर समस्या निर्माण झाली. तसेच त्यांच्या पत्नीलाही कॅन्सर झालेला आहे. तर अजून एक आरोपी प्रदीप याची पत्नी किडनी फेल झाल्याने मृत्युमुखी पडल्या आहेत.
27 जानेवारी 2002रोजी गुजरातच्या गोधरा स्टेशनवर साबरमती एक्सप्रेसच्या 5ते 6 डब्यांना आग लावण्यात आली होती. त्यात 59जणांचा मृत्यू झाला होता. हे सगळे अयोध्येतून परत येणारे कारसेवक होते. या प्रकरणानंतर गुजरातमध्ये दंगली भडकल्या होत्या. यात हजारांवर माणसे मारली गेली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री होते.