मुस्लीम लॉ बोर्डाचा पुन्हा फतवा, मुस्लीम मुला-मुलींनी सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात जाऊ नये !

शाळांमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रम घेण्याऐवजी सरकारने देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, रुपयाचे अवमूल्यन, देशाच्या सीमेचे रक्षण याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने केले आहे.

मुस्लीम लॉ बोर्डाचा पुन्हा फतवा, मुस्लीम मुला-मुलींनी सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात जाऊ नये !
Yoga
Follow us
| Updated on: Jan 04, 2022 | 1:46 PM

नवी दिल्लीः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शाळांमध्ये 1 ते 7 जानेवारी दरम्यान सूर्यनमस्कार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशाला ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने विरोध केला आहे. शाळांमध्ये असे कार्यक्रम घेऊ नयेत, अशी मागणीही बोर्डाच्या वतीने करण्यात आली आहे. मुस्लीम मुला-मुलींनी सूर्यनमस्काराच्या कार्यक्रमात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नेमके प्रकरण काय आहे, जाणून घेऊयात.

सरकारचा आदेश काय?

भारत सरकारने स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शाळांमध्ये सूर्यनमस्कार कार्यक्रम घेण्याचे आदेश दिले आहेत. 30 राज्यांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. 1 जानेवारी 2022 ते 7 जानेवारी 2022 दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करावे, अशा सूचना आहेत. तर 26 जानेवारी रोजी सूर्यनमस्कारावर आधारित संगीत कार्यक्रम घेण्यात येणार असल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात 30 हजार शाळांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. आंध्र प्रदेशच्या सर्व शिक्षणाधिकारी कार्यालयात तसे आदेश येऊन धडकले आहेत, असे ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डने आपल्या पत्रात म्हटले आहे.

आक्षेप कशासाठी?

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे महासचिव हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी या निर्णयावर आक्षेप घेताना म्हटले आहे की, भारत एक धर्मनिरपेक्ष, बहुधार्मिक आणि बहु-सांस्कृतिक देश आहे. यावर आधारितच आपली राज्यघटना लिहिण्यात आली आहे. कोणत्याही सरकारी शिक्षण संस्थेमध्ये धर्माबाबत शिक्षण द्यायला किंवा कोणत्या एका विशेष समूहाच्या मान्यतेच्या आधारावर कार्यक्रमाचे आयोजन करायला, आपली राज्यघटना परवानगी देत नाही. सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करणे दुर्दैवी घटना असून, सध्याचे सरकार राज्यघटनेच्या मूळ उद्देशापासून भटक आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. शिवाय मुस्लीम मुला-मुलींनी या कार्यक्रमाला जाऊ नये, असे आवाहन केले आहे.

बेरोजगारी, महागाईकडे लक्ष द्या

हजरत मौलाना खालिद सैफुल्लाह रहमानी यांनी पुढे म्हटले आहे की, सूर्यनमस्कार कार्यक्रमाचे आयोजन करणे हे घटनाविरोधी कृत्य आहे. देशप्रेमाचा खोटा प्रचार आहे. सूर्यनमस्कार हा सूर्याच्या पूजेचा एक प्रकार आहे. मुस्लीम किंवा इतर अल्पसंख्याक ना सूर्याला देव मानतात ना त्याची उपासना, पूजा करतात. त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घेत धर्मनिरपेक्षता मूल्याचा सन्मान करावा, असे आवाहन केले आहे. शिवाय देशप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी राष्ट्रगीत म्हणावे, असे आवाहन केले आहे. देशातील वाढती बेरोजगारी, महागाई, रुपयाचे अवमूल्यन, देशाच्या सीमेचे रक्षण याकडे सरकारने लक्ष द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

इतर बातम्याः

Jalgaon| भाजपच्या 29 नगरसेवकांना विभागीय आयुक्तांची नोटीस; पात्रतेबाबत काय होणार निर्णय?

Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 59 अर्ज; कशी रंगलीय निवडणूक?

Nashik| नाशिकमध्ये घरपट्टी माफ होणे तूर्तास अशक्य, घोडे कुठे आडले?

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.