विमानात बसण्यापूर्वी सर्व प्रवाशांचे रिपोर्ट होते निगेटिव्ह; पण विमानातून उतरल्यावर 52 प्रवासी निघाले पॉझिटिव्ह
जे प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत, ते सर्व प्रवासी भारतीय विमान कंपनी विस्ताराच्या विमानाने हॉंगकॉंगला पोहोचले होते. या प्रवाशांना नेमका कोरोना संसर्ग कोठून झाला, हे नवे कोडे प्रशासनाला पडले आहे. (All passengers reported being negative before boarding the plane; However, on arrival in Hong Kong, 52 passengers left positive)

नवी दिल्ली : देशात दररोज कोरोनाची नवनवी धक्कादायक माहिती, धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. याचदरम्यान आता कोरोना चाचणीच्या अहवालांनी मोठा धक्का दिला आहे. कोरोनाच्या चाचणीवर किती विश्वास ठेवायचा, असा प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे. दिल्लीतून हॉंगकॉंगला एका विमानाने उड्डाण केले, त्यातील सर्व प्रवाशांनी विमानात बसण्यापूर्वी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचे सर्वांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले होते. त्यामुळे सर्व प्रवाशांनी बिनधास्त विमान प्रवासाला सुरुवात केली होती. मात्र हे विमान जेव्हा सिंगापूरच्या विमानतळावर पोहोचले, त्यावेळी तेथील प्रशासनाने सर्वांची पुन्हा कोरोना चाचणी केली असता त्यात 52 प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. जे प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत, ते सर्व प्रवासी भारतीय विमान कंपनी विस्ताराच्या विमानाने हॉंगकॉंगला पोहोचले होते. या प्रवाशांना नेमका कोरोना संसर्ग कोठून झाला, हे नवे कोडे प्रशासनाला पडले आहे. (All passengers reported being negative before boarding the plane; However, on arrival in Hong Kong, 52 passengers left positive)
रुग्णसंख्या नियंत्रणात आलेल्या हॉंगकॉंगला भरली धडकी
भारतातून विमानाने गेलेले 52 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे हॉंगकॉंगमधील प्रशासनाच्या चिंतेत मोठी भर पडली. हॉंगकॉंगमध्ये सध्या कोरोनाची चौथी लाट आहे. मात्र तेथील रुग्णसंखया नियंत्रणात आली आहे. ज्या दिवशी 52 भारतीय प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते, त्या दिवशी तेथे आढळलेल्या इतर कोरोना रुग्णांची संख्या तुलनेत कमी होती. विस्ताराच्या विमानाने भारतातून उड्डाण केले, त्यावेळी विमानात एकूण 186 प्रवासी होते. मात्र विमान हॉंगकॉंगला उतरले, त्यावेळी विमानात किती प्रवासी होते, याचा नेमका आकडा हॉंगकॉंगच्या प्रशासनाने जाहीर केलेला नाही.
कोरोना संसर्गामागील तज्ज्ञांचे मत काय?
एकाच वेळी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमान प्रवाशांना कोरोना संसर्ग होण्यामागे चार कारणे असू शकतात, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी म्हटले आहे. भारतातून विमान प्रवास सुरुवात करणाऱ्या प्रवाशांना आधीच कोरोनाची लागण झालेली असावी. मात्र भारतातील आरोग्य यंत्रणेवर आधीच कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा ताण असल्यामुळे त्यांच्याकडून योग्य प्रकारे कोरोना चाचणी करण्यात आली नसावी, अशी शक्यता काही जाणकारांनी वर्तवली आहे. काही जाणकारांच्या मते, प्रवाशांना ज्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले गेले आहे, तेथूनच त्यांना कोरोनाची लागण झाली असू शकेल. हॉंगकॉंगमध्ये कुणालाही कोरोनाची लागण झाली की तीन आठवड्यांपर्यंत क्वारंटाईन केले जाते. (All passengers reported being negative before boarding the plane; However, on arrival in Hong Kong, 52 passengers left positive)
‘शालू’ कोरोनाग्रस्त, चाहते म्हणतात, मले पण भीती वाटायला लागलीय!#FandryMovie #JabyaShalu #coronavirus #coronawave #RajeshwariKharat #RajeshwariKharatCoronapositivehttps://t.co/xxOv97qCA5
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 26, 2021
इतर बातम्या
कोरोनाची लस स्वस्त होणार? केंद्राने सिरम, भारत बायोटेकला दिले हे निर्देश
दिलासादायक! राज्यात आज 48,700 कोरोनाबाधित सापडले, तर 542 जणांचा मृत्यू