Decree of Chief Yogi : केवळ तुमचीच नाही, तर पत्नी-मुलगा-मुलगी-सून यांच्याही मालमत्तेचा तपशील द्या, मुख्यमंत्री योगींचे फर्मान
राज्यात सेवेत असणाऱ्या 'सर्व लोकसेवकांनी (IAS/PCS) स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे असणाऱ्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील ही द्यावा
लखनऊ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांनी आधी राज्यातील दंगलखोर आणि गुन्हेगार यांच्या संपत्तीवर बुल्डोजर चालवून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर त्यांनी राज्यात बुल्डोजर मॉडेल तयार केले असून असेच बुल्डोजर चालवत राहू असे म्हटले होते. त्यानंतर आता हे बुल्डोजर मॉडेल भ्रष्टाचाऱ्यांवर (Corruption) चालणार असल्याचीच शक्यता निर्माण झाली आहे. त्याबाबत मुख्यमंत्री योगी यांनी असेच काहीसे संकेत दिले आहे. मुख्यमंत्री योगी यांनी भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलता धोरण स्वीकारले आहे. आता राज्यातील सर्व मंत्र्यांसह आयएएस (IAS) आणि पीसीएस अधिकाऱ्यांकडून त्यांच्या संपत्तीचा तपशील मागवण्यात आला आहे. मंत्री आणि अधिकारी यांना केवळ त्यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशीलच द्यावा लागणार नाही तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबातील सदस्यांच्या नावे असणाऱ्या संपत्तीचीही माहिती आता सरकारला द्यावी लागणार आहे. उत्तर प्रदेशमधील सरकारमध्ये असणाऱ्या मंत्र्यासह अधिकाऱ्यांना आता धाम फुटला आहे.
तीन महिन्यांच्या आत तपशील जाहीर करावा
यादरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत माहिती दिली. तसेच ते म्हणाले की, सुदृढ लोकशाहीसाठी लोकप्रतिनिधींच्या वर्तनाचे पावित्र्य अत्यंत महत्त्वाचे आहे. या भावनेनुसार सर्व माननीय मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर पुढील तीन महिन्यांच्या आत स्वत:च्या व कुटुंबातील सदस्यांच्या सर्व जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील जाहीर करावा.
तसेच राज्यात सेवेत असणाऱ्या ‘सर्व लोकसेवकांनी (IAS/PCS) स्वतःच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावे असणाऱ्या जंगम आणि स्थावर मालमत्तेचा तपशील ही द्यावा, असेही मुख्यमंत्री योगी म्हणाले, तसेच ते म्हणाले, हा तपशील सर्वसामान्यांच्या अवलोकनासाठी ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध करून द्यावा. तर या सरकारी कामात मंत्र्याच्या कुटुंबीयांनी हस्तक्षेप करू नये.
सोमवार आणि मंगळवारचा मुक्काम राजधानीतच
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘सर्व मंत्र्यांना सोमवार आणि मंगळवारी राजधानीतच राहावे लागेल. शुक्रवार ते रविवार या कालावधीत तुमच्या मतदारसंघात/जिल्ह्यातील प्रभारी लोकांमध्ये सहभागी होण्यासाठी कार्यक्रम तयार करा.
18 मंत्रिगटांचीही स्थापना
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार, 18 मंत्र्यांचे गट तयार करण्यात आले आहेत, ज्यात प्रत्येकी तीन मंत्र्यांचा समावेश आहे. या मंत्रिगटांना प्रत्येकी एका मंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे, जिथे ते शुक्रवार ते रविवार भेट देतील आणि सरकारच्या योजनांची माहिती देतील.
हे मंडळ या मंत्र्यांना जबाबदार आहे
1- उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य- आग्रा विभाग २- उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक – वाराणसी विभाग 3- सूर्य प्रताप शाही – मेरठ विभाग 4- सुरेश खन्ना – लखनौ विभाग 5- स्वतंत्र देव सिंग – मुरादाबाद विभाग 6- बेबी राणी मौर्या – झाशी मंडळ 7- चौधरी लक्ष्मी नारायण – अलीगढ सर्कल 8- जयवीर सिंग- चित्रकूट धाम मंडळ ९- धरमपाल सिंग – गोरखपूर विभाग १०- नंदगोपाल गुप्ता ‘नंदी’- बरेली 11- भूपेंद्र सिंग- मिर्झापूर विभाग 12- अनिल राजभर – प्रयागराज मंडळ 13- जितिन प्रसाद- कानपूर विभाग 14- राकेश सचन – देवीपाटण मंडळ 15- अरविंद शर्मा- अयोध्या मंडळ १६- योगेंद्र उपाध्याय- सहारनपूर विभाग 17- आशिष पटेल- बस्ती मंडळ 18- संजय निषाद – आझमगड सर्कल