तरुण चेहरा, संघाशी कनेक्शन, वडील माजी सैनिक; वाचा कोण आहेत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री?

तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे आगामी मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. (Pushkar singh Dhami)

तरुण चेहरा, संघाशी कनेक्शन, वडील माजी सैनिक; वाचा कोण आहेत उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री?
Pushkar singh Dhami
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 5:44 PM

डेहराडून: तीरथ सिंह रावत यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याचे आगामी मुख्यमंत्री म्हणून पुष्कर सिंह धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. पुष्कर सिंह धामी हे तरुण आणि उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे आमदारकीची दुसरी टर्म असतानाही भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. (All You Need to Know About Uttarakhand’s New CM Pushkar Singh Dhami)

तीरथ सिंह रावत यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदासाठी तीन-चार नावं चर्चेत होती. मात्र, भाजप नेतृत्वाने पुष्कर सिंह धामी यांच्यावर विश्वास दाखवला आहे. धामी हे खटीमा विधानसभा मतदारसंघातून दोनदा विजयी झाले आहेत. राज्यातील तरुण नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जवळचेही असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

उच्च शिक्षित मुख्यमंत्री

पुष्करसिंह धामी हे उत्तराखंडमध्ये भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्षही होते. 2002 ते 2008 पर्यंत त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. धामी यांचा जन्म टुंडी, पिथौरागड येथे झाला होता. त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांना तीन बहिणी आहेत. त्यांचे वडील माजी सैनिक होते.

दोन वेळा जिंकले

उत्तराखंडमधील खटीमा विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा विजयी झाले आहेत. 2012 ते 2017 पर्यंत ते आमदार होते. 2017च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. अवघ्या दुसऱ्या टर्ममध्येच त्यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली आहे. त्यांनी 1990 ते 1999पर्यंत एबीव्हीपीमध्ये अनेक पदांवर काम केलं आहे. भाजयुमोच्या अध्यक्षपदी असताना सहा वर्ष राज्यात फिरून बेरोजगार तरुणांचं संघटन उभारल्याचा धामी यांचा दावा आहे.

चर्चेतले सर्व बाद

रावत यांच्या राजीनाम्यानंतर धामी यांच्यासह अनेक नेते मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते. सतपाल महाराज, त्रिवेंद्र सिंह रावत, धनसिंह रावत आदी नेतेही या रेसमध्ये होते. मात्र, या सर्वांना मागे टाकत धामी यांनी बाजी मारली आहे. (All You Need to Know About Uttarakhand’s New CM Pushkar Singh Dhami)

संबंधित बातम्या:

पुष्कर सिंह धामी यांच्याकडे उत्तराखंडची सूत्रे, राज्याचे 11 वे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ

उत्तराखंडात 10 वर्षात 6 मुख्यमंत्री बदलले; कारण काय? वाचा सविस्तर

तीरथ सिंह रावत यांच्या राजीनाम्यानंतर उत्तराखंडेच्या पुढचा मुख्यमंत्री कोण? ‘ही’ 2 नावं शर्यतीत

(All You Need to Know About Uttarakhand’s New CM Pushkar Singh Dhami)

सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.