नितीशकुमारांसह आता ममताही मैदानात, 2024 निवडणुकांसाठी महाआघाडीची घोषणा, काँग्रेसचा मात्र उल्लेख नाही
ममता बॅनर्जी यांनी यावेळी भाजपावर जोरदार टीका केली आहे. ईडी आणि सीबीआय या यंत्रणांना भाजपा पाळीव प्राण्यांप्रमाणे वागवत असल्याची टीका त्यांनी केली आहे. ही मंडळी दररोज तृणमूलच्या नेत्यांच्या घरांवर छापे मारत असल्याचे त्या म्हणाल्या. ममता पुढे म्हणाल्या की, जर तुम्हाला आमच्याशी लढायचे असेल तर राजकीय रणभूमीत लढा.
नवी दिल्ली – प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांनी गुरुवारी 2024 च्या लोकसभा निवडणुकांसाठी (2024 Loksabha Election) महाआघाडीची घोषणा केली. यात त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar), झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, सपाचे अखिलेश यादव आणि इतर नेत्यांची नावे घेतली. ही महाआघाडी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपासमोर आव्हान उभे करेल, असे ममता म्हणाल्या. मात्र यावेळी ममता यांनी काँग्रेसच्या एकाही नेत्याचे नाव घेतले नाही. यातून ममता आणि काँग्रेसचे संबंध बिघडले असल्याचे मानण्यात येते आहे.
Kolkata, WB | In 2024 we will play a game that will start from Bengal. Hemant (Soren), Akhilesh (Yadav), Nitish (Kumar), I & other friends will unite then. How will they (BJP) form govt then? There’s no need for BJP govt: CM Mamata Banerjee pic.twitter.com/qfuGsyI2S8
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) September 8, 2022
ईडी आणि सीबाआय़ हे भाजपाचे पाळीव असल्याची टीका
ममता बॅनर्जी यांनी यावेळी भाजपावर जोरदार टीका केली आहे. ईडी आणि सीबीआय या यंत्रणांना भाजपा पाळीव प्राण्यांप्रमाणे वागवत असल्याची टीका त्यांनी केली आहे. ही मंडळी दररोज तृणमूलच्या नेत्यांच्या घरांवर छापे मारत असल्याचे त्या म्हणाल्या. ममता पुढे म्हणाल्या की, जर तुम्हाला आमच्याशी लढायचे असेल तर राजकीय रणभूमीत लढा. 2021 साली तुम्ही माझा पाय मोडला होतात. ते अतिशय वाईट होते. मात्र मी आता मानसिक शक्तीने काम करते आहे. जखमी झालेला प्राणी हा जखमी नसलेल्या प्राण्यापेक्षा जास्त धोकादायक असतो. जोपर्यंत मला कुणी दुखावत नाही, तोपर्यंत मी कुणाला दुखावत नाही, असेही ममता म्हणाल्या.
मी त्यांची नोकर नाही, ममतांचे भाजपावर टीकास्त्र
दिल्लीत झालेल्या सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेच्या अनावरण कार्यक्रमाला जाणार नसल्याचेही ममता यांनी स्पष्ट केले आहे. याचे कारण त्यांना एका अधिकाऱ्याने केवळ चिठ्ठी पाठवून निमंत्रण दिले हे असल्याचेही त्यांनी सांगितले. मी यांची नोकर असल्याप्रमाणे यांनी आपल्याला कार्यक्रमाला बोलावले, अशी टीका त्यांनी केली आहे.
ममता, नितीश यांच्यावर भाजपाचा पलटवार
दुसरीकडे भाजपाने या महाविकास आघाडीलवर टीका केली आहे. ममता, नितीशकुमार, के चंद्रशेखर आणि काँग्रेस या पक्षांच्या नेत्यांमध्ये सरकार तयार करण्याची क्षमता आणि ताकद नसल्याची टीका भाजपाने केली आहे. नितीशकुमार, ममता, शरद पवार आणि केसीआर यांना काँग्रेस दाखवून देत आहे की त्यांच्याशिवायही काँग्रेस सगळीकडे अस्तित्वात आहेत. हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, भाजपाचा त्याच्याशी संबंध नाही असेही सुधांशु त्रिवेदी म्हणाले आहेत.