आता काँग्रेसमध्ये राहणार नाही, कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मोठी घोषणा, भाजपमध्ये जाणार का?; वाचा काय म्हणाले कॅप्टन?
पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने काँग्रेस नेते कॅप्टर अमरिंदर सिंग प्रचंड दुखावले गेले आहेत. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. (Amarinder Singh said he is Not Joining BJP But Won't Remain In Congress)
चंदीगड: पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने काँग्रेस नेते कॅप्टर अमरिंदर सिंग प्रचंड दुखावले गेले आहेत. मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर काल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर आज अमरिंदर सिंग यांनी काँग्रेस सोडणार असल्याची घोषणाच केली. मात्र, तूर्तास भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचंही अमरिंदर सिंग यांनी जाहीर केलं. त्यामुळे अमरिंदर सिंग नेमका काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी अमरिंदर सिंग यांनी ही घोषणा केली. मी संपूर्ण परिस्थिती आधीच सांगितली आहे. अशा प्रकारचा अपमान सहन करणार नसल्याचंही मी आधीच स्पष्ट केलं आहे. मला ज्या पद्धतीची वागणूक देण्यात आली ती योग्य नव्हती, असं सांगतानाच तूर्तास भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याचं अमरिंदर सिंग यानी स्पष्ट केलं.
तेव्हाच पद सोडणार असल्याचं जाहीर केलं
काँग्रेस पक्षाने आमदारांची बैठक बोलावली. त्याची मला ऐनवेळी माहिती देण्यात आली. तेव्हाच मी पद सोडत असल्याचं जाहीर केलं. जर माझ्यावर कुणाचाच विश्वास राहिला नसेल तर काँग्रेसमध्ये राहण्याला अर्थच काय?, असा सवालही त्यांनी केला.
सिद्धू टीम प्लेअर नाही
यावेळी नवज्योतसिंग सिद्धूंबाबतही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नवज्योतसिंग सिद्धू हे टीम प्लेअर नाहीत. पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी टीम प्लेअरची गरज असते. पंजाबमध्ये काँग्रेसची लोकप्रियता कमी होत असून आम आदमी पार्टीचा ग्राफ वाढत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. यावेळची पंजाब विधानसभा निवडणूक वेगळीच असेल. काँग्रेस आणि अकाली दल पंजाबमध्ये आहेच. पण आता आम आदमी पार्टीचाही ग्राफ वाढत चालल्याने आपचं आव्हानही असणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
म्हणून शहा, डोभाल यांना भेटलो
मी पंजाबचा मुख्यमंत्री नसेलही, पण पंजाब आजही माझेच आहे. म्हणूनच मी अमित शहा आणि केंद्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांची भेट घेतली होती, असं त्यांनी सांगितलं.
शहांना भेटले
दरम्यान, अमरिंदर सिंग यांनी काल सकाळी जाखड यांना प्रदेशाध्यक्षपद देण्याची मागणी केल्यानंतर संध्याकाळी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतली. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सिंग भाजपमध्ये सामील होणार असून त्यांना केंद्रीय कृषीमंत्रीपद देण्याचं भाजपमध्ये घटत असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
मुख्यमंत्रीपदासाठी सेटिंग?
दरम्यान, अमरिंदर सिंग हे भाजपमध्ये सामील झाल्यास त्यांना केंद्रात कृषी मंत्रीपद दिलं जाऊ शकतं. पंजाबच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना हे पद दिलं जाऊ शकतं. तसेच केंद्रीय मंत्रीपद देऊन सिंग यांच्याच नेतृत्वात भाजप राज्यात निवडणुका लढवू शकते. शिवाय भाजपकडून अमरिंदर सिंग यांनाच मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणूनही जाहीर केलं जाऊ शकतं. सिंग यांनाही राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं म्हणून त्यांनी तशी सेटिंग केली असावी, असंही जाणकार सांगतात.
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 30 September 2021https://t.co/YxYKSsEAi4#mahafast100newsbulletin #mahafast100news #marathinews
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 30, 2021
संबंधित बातम्या:
उसूलों पर आंच आए तो टकराना जरूरी है; राजीनाम्यानंतर नवज्योतसिंग सिद्धूंनी मौन सोडले
(Amarinder Singh said he is Not Joining BJP But Won’t Remain In Congress)