पंजाबच्या राजकारणात जबरदस्ती हस्तक्षेप करू नका, हानीकारक ठरेल; अमरिंदर सिंग यांचं थेट सोनिया गांधींना पत्रं
पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह शिगेला पोहोचला आहे. पंजाबचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्रं लिहिलं आहे. (Amarinder singh)
नवी दिल्ली: पंजाब काँग्रेसमधील अंतर्गत कलह शिगेला पोहोचला आहे. पंजाबचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्रं लिहिलं आहे. पंजाबच्या राजकारणात जबरदस्तीने हस्तक्षेप करू नका. नाही तर हानीकारक ठरेल, असा इशारा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी सोनिया गांधी यांना दिला आहे. (Amarinder writes to Sonia expresses reservation over Sidhu as Punjab Cong chief)
काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू शुक्रवारी सोनिया गांधींना भेटले. त्यानंतर सिद्धूंच्या निवासस्थानी संध्याकाळी त्यांच्या समर्थकांची गर्दी झाली. काहींनी तर सिद्धूंना गुच्छ देऊन शुभेच्छाही दिली. त्यामुळे सिद्धू यांना अमरिंदर मंत्रिमंडळात मोठं मंत्रिपद किंवा प्रदेशाध्यक्षपद मिळणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. काँग्रेसचे पंजाबचे प्रभारी हरीश रावत यांनीही सिद्धू यांना पंजाबचे प्रदेशाध्यक्ष बनवलं जाऊ शकतं, असं एका मुलाखतीत जाहीर केलं होतं. त्यामुळे काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग यांनी थेट सोनिया गांधींना पत्रं लिहून निर्वाणीचा इशारा देणारं पत्रंच लिहिलं.
जुन्या नेत्यांकडे दुर्लक्ष नको
काँग्रेस हायकमांडने जबरदस्ती पंजाब सरकार आणि पंजाबच्या राजकारणात हस्तक्षेप करू नये. पंजाबची परिस्थिती अनुकूल नाही, हे हायकमांडला समजलं पाहिजे. त्याचं पक्ष आणि संघटनेचा नुकसान होऊ शकतं, असं अमरिंदर सिंग यांनी या पत्रात म्हटलं आहे. जुन्या नेत्यांकडे दुर्लक्ष करणं योग्य होणार नाही. त्याचा विधानसभा निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो, असं सांगत अमरिंदर सिंग यांनी थेट नवज्योत सिंग यांच्या प्रदेशाध्यक्ष बनण्यास विरोध केला आहे.
रावत सिंग यांना भेटणार?
दरम्यान, हरीश रावत हे अमरिंदर सिंग यांची भेट घेणार असून सिद्धूंसोबतच्या वादावर तोडगा काढणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे पंजाबमध्ये नेमकं काय होणार? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. (Amarinder writes to Sonia expresses reservation over Sidhu as Punjab Cong chief)
VIDEO : Fast News | दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी | 4 PM | 16 July 2021https://t.co/rMMxZZbgzy | #UddhavThackeray | #SharadPawar | #Mumbai | #Maharashtra |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 16, 2021
संबंधित बातम्या:
रेल्वेमंत्र्यांनी गांधीनगर स्टेशनवर घेतला सेल्फी; म्हणाले, देशाच्या आकांक्षा पूर्ण करणारा प्रकल्प
ज्यांना भीती वाटते त्यांनी खुशाल जावे; काँग्रेस सोडून जाणारे संघाचे होते: राहुल गांधी
(Amarinder writes to Sonia expresses reservation over Sidhu as Punjab Cong chief)