Amarnath Yatra : बसचे ब्रेक फेल, जवानांनी असे वाचवले 40 अमरनाथ यात्रेकरुंचे प्राण

Amarnath Yatra : बसला नाल्यात कोसळण्यापासून वाचवलं. या बसमध्ये 40 प्रवासी होते. ब्रेक फेल झाल्याच समजल्यानंतर बसमधील प्रवासी पार हादरुन गेले होते. अनेक लोक बसमध्ये जागेवरुन उठले व पळापळ सुरु केली.

Amarnath Yatra : बसचे ब्रेक फेल, जवानांनी असे वाचवले 40 अमरनाथ यात्रेकरुंचे प्राण
Amarnath Yatra bus break fail
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 2:10 PM

भारतीय सैन्याच्या जवानांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून NH-44 वर एक मोठी दुर्घटना टाळण्यात यश मिळवलं. अमरनाथवरुन पंजाबच्या होशियारपुरला जाणाऱ्या एका बसचा ब्रेक फेल झाला होता. त्यामुळे बसने नियंत्रण गमावलं होतं. या बसमध्ये बरेच प्रवासी होते. जवानांनी हुशारी दाखवून बसला नियंत्रित केलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. भारतीय सैन्याच्या जवानांनी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत मिळून बसची गती कमी केली.

बसची गती कमी करण्यासाठी चाकांखाली दगड ठेऊन स्पीड नियंत्रणात आणण्याचा भरपूर प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी झाले. बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर बसला नियंत्रित करण्यात यश मिळवलं. बसला नाल्यात कोसळण्यापासून वाचवलं. या बसमध्ये 40 प्रवासी होते. ब्रेक फेल झाल्याच समजल्यानंतर बसमधील प्रवासी पार हादरुन गेले होते. अनेक लोक बसमध्ये जागेवरुन उठले व पळापळ सुरु केली. यात काही लोक जखमी झाले. जखमींमध्ये सहा पुरुष, तीन महिला आणि एक लहान मुलगा आहे.

सैन्याची क्विक रिएक्शन टीम लगेच पोहोचली

अधिकाऱ्यांनी सांगितलं की, बसमध्ये 40 यात्रेकरु होते. पंजाब होशियारपुरला ते चालले होते. बनिहालच्या जवळ नचलाना येथे पोहोचल्यानंतर ब्रेक फेल झाल्यामुळे ड्रायव्हर बस थांबवू शकला नाही. सैन्याची क्विक रिएक्शन टीम रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचली. सर्व जखमींची मदत केली. सर्व जखमींना नचलानाच्या स्थानिक मेडीकल फॅसिलिटीमध्ये मदत देण्यात आली. काही लोक गंभीर जखमी झाले होते.

Non Stop LIVE Update
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही
'त्या' प्रश्नावर पांड्यानं जे उत्तर दिलं अन् मोदींनाही हसू आवरलं नाही.
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला
बर झाल त्याच्या हातात कॅच बसला नाहीतर..सूर्याच्या कॅचवरून रोहितचा टोला.
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत
विधानभवनात वर्ल्डकप विजेत्या चॅम्पियन्सच मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत.
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?
VIDEO: डोळ्यांच पारण फेडणारा कोयनेतील ओझर्डे धबधबा तुम्ही पाहिलाय का?.
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?
लाडकी बहीणला आणखी अटी लावा, 'यांना' लाभ देऊ नका, कुणाची आक्रमक मागणी?.
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका
सरकारी पैशातून मत खरेदी..., 'लाडकी बहीण'वरून वडेट्टीवारांची सडकून टीका.
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप
'लाडकी बहीण'चा बोजवारा..सर्व्हर बंद, महिलांची लांबलचक रांग अन् मनस्ताप.
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला
बसवर टीका करणारे रोहितच्या मागे फोटोसाठी पोट धरून..भाजप नेत्याचा टोला.
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?
संदेह गमला, रेडा कैसा बोलविला..तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला?.
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक
वर्ल्डकप जिंकून मायदेशी रोहित शर्माला पाहून वर्ल्ड चॅम्पियनची आई भावूक.