पक्षी अन् मानवाची अनोखी मैत्री | सोबतच जेवण, दुकानात जाणे, ही दोस्ती ठरली लय भारी

सारस त्याच्या सावलीप्रमाणे त्याच्या मागे असतो. आरिफ दुकानात सामान खरेदी करतो तेव्हा त्याच्या शेजारी सारस उभा असतो. हे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटतं, पण हळूहळू सगळ्यांना या मैत्रीची जाणीव झाली.

पक्षी अन् मानवाची अनोखी मैत्री | सोबतच जेवण, दुकानात जाणे, ही दोस्ती ठरली लय भारी
मैत्रीची अनोखी कथा
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 5:00 PM

अमेठी : मैत्रीच्या (Friendship) अनेक कथा ऐकल्या अन् वाचल्या असतील. मग ती भगवान श्रीकृष्ण अन् सुदामाची कथा असो की शोले चित्रपटामधील जय-वीरुची दोस्ती…परंतु मानव व पक्षी यांची मैत्री तुमच्यासाठी नवीनच असणार. आजपर्यंत अशी मैत्री पहिली किंवा ऐकली नसणार. अमेठीतील युवक आणि सारस पक्षी यांची मैत्री परिसरातच नाही तर सोशल मीडियावर धुम करत आहे. आरिफने सात महिन्यांपुर्वी जखमी सारसवर उपचार केले. मग हा पठ्ठा गेलाच नाही. त्याने कायमचे आरिफशी नाते जोडले. आता आरिफ जिथे जातो तिथे सारस सोबत असतो. तो त्याच्यासोबतत जेवतो.. त्याच्यासोबत राहतो. इतकंच नाही तर जेव्हा आरिफ बाजारात जातो तेव्हा तो त्याच्या बाईकसोबत उडत जातो.

कशी झाली मैत्री

अमेठी जिल्ह्यातील गौरीगंज तालुक्यातील मुंडका गावात आरिफ राहतो. सात महिन्यांपूर्वी म्हणजेच ऑगस्ट २०२२ मध्ये आरिफ शेताकडे जात होता. तिथे त्याला एक पाय तुटलेला सारस दिसला. आरिफ त्याच्या जवळ गेला, तरी तो उडाला नाही. मग आरिफने त्याला आपल्या घरी आणले. त्याच्यावर मलमपट्टी केली. काही दिवसांच्या उपचारानंतर तो बरा झाला. आता आरिफ आणि त्याच्या कुटुंबीयांना आशा होती की, तो उडून जाईल, पण तसे झाले नाही.

मैत्री तुटायची नाही

आरिफच्या सेवेने सारसने त्याच्याशी कायमची मैत्री केली. तो त्याच्या घराजवळ व म्हणजे घरातच राहू लागला. आता तो त्याच्या कुटुंबाचा सदस्यच झाला. आरिफ जिथे जातो तिथे सारस सोबत असतो. तो त्याच्यासोबत जेवतो तसेच त्याच्यासोबत राहतो.  इतकंच नाही तर जेव्हा त्याला बाजारात जावं लागतं, तेव्हा तो त्याच्या बाईकसोबत उडून सोबत जातो. हा सारस त्याच्या सावलीप्रमाणे त्याच्या मागे असतो. आरिफ दुकानात सामान खरेदी करतो तेव्हा त्याच्या शेजारी सारस उभा असतो. हे पाहून लोकांनाही आश्चर्य वाटतं, पण हळूहळू सगळ्यांना या मैत्रीची जाणीव झाली.

काय म्हणतो आरिफ

मोहम्मद आरिफ यांनी सांगितले की, सुमारे सात महिन्यांपुर्वी तो शेतात गेला होता. जिथे हा सारस पक्षी जखमी अवस्थेत आढळला, त्यानंतर आरिफने जखमी सारसवर उपचार केले. ज्यानंतर तो गेलाच नाही, तेव्हापासून आजपर्यंत तो फक्त त्यांच्यासोबतच राहतो. एखाद्या पक्षासोबत अशी मैत्री होईल, याचा विचारही केला नव्हता. आरिफच्या वडिलांचे म्हणणे आहे की, आता सारस त्याच्या कुटुंबातील सदस्यासारखा झाला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.