‘कोणताही प्रोपोगांडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही’, शेतकरी आंदोलनावर सुरु असलेल्या घमासानवर गृहमंत्र्यांचं मोठं विधान

दिलेल्या सीमेवर सुरु असलेला शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आता जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे (Amit Shah said No propaganda can deter India’s unity)

'कोणताही प्रोपोगांडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही', शेतकरी आंदोलनावर सुरु असलेल्या घमासानवर गृहमंत्र्यांचं मोठं विधान
अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री
Follow us
| Updated on: Feb 03, 2021 | 10:54 PM

नवी दिल्ली : दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेला शेतकरी आंदोलनाचा मुद्दा आता जागतिक पातळीवर चर्चेचा विषय ठरला आहे. हॉलिवूडची पॉप सिंगर रिहाना हीने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने तिला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. मात्र, कंगनाने आंदोलक शेतकऱ्यांना अतिरेकी म्हटलंय. कंगनाच्या ट्विटनंतर अभिनेता अक्षय कुमार आणि अजय देवगन यांनीदेखील रिहानाच्या ट्विटवर टीका करत भारताची एकता आणि अखंडता नेहमी अबाधित आहे आणि राहील, असा संदेश दिला. त्यानंतर आता थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत या विषयावर भाष्य केलं आहे (Amit Shah said No propaganda can deter India’s unity).

“कोणताच प्रोपोगांडा भारताच्या एकतेला तोडू शकत नाही. आम्ही एकजुटीने प्रगतीच्या दिशेने जाऊ. कोणताच चुकीचा प्रचार भारताला प्रगतीचा दिशेला जाण्यापासून रोखू शकत नाही. हे अशाप्रकारचे प्रोपोगांडा भारताच्या भविष्याचा निर्णय घेऊ शकत नाही. भारताची प्रगतीसाठी एकजूट आहे”, असं अमित शाह ट्विटरवर म्हणाले (Amit Shah said No propaganda can deter India’s unity).

रिहाना काय म्हणाली होती?

जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेतकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने म्हटलं आहे. इतकंच नाही तर रिहानाने ट्विट करताना ‘#FarmersProtest’ असा हॅशटॅगही वापरला आहे. रिहानाने ट्विट केलेल्या बातमीमध्ये दिल्लीमध्ये आंदोलनावेळी परिसरातील इंटरनेट बंद करण्यात आल्याची बातमी देण्यात आली आहे.

रिहानाच्या ट्विटला विदेश मंत्रालयाचं उत्तर

रिहानाच्या ट्विटला देशाच्या विदेश मंत्रालयाने उत्तर दिलं. याप्रकरणी कोणतंही ट्विट करण्याआधी नेमकं तथ्य काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करावा, अशी आम्ही आग्रह करतो. भारतीय संसदेत कृषी कायद्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतरच कृषी कायद्यांना मान्यता देण्यात आली आहे, असं विदेश मंत्रालयाने म्हटले आहे.

अक्षयकुमारची सावध भूमिका

शेतकरी आंदोलनावरून अभिनेता अक्षयकुमारने सावध भूमिका घेतली आहे. त्याने परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनाचं समर्थन केलं आहे. शेतकरी आपल्या देशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत प्रयत्न केले पाहिजेत. त्या प्रयत्नांना पाठिंबा दिला पाहिजे. जे लोक दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे, असं अक्षयने ट्विटमध्ये म्हटलं आहे. अक्षयने केंद्र सरकार आणि शेतकरी दोन्ही नाराज होणार नाहीत, अशा पद्धतीने आपली भूमिका मांडली आहे. तसेच या ट्विटमध्ये त्याने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हा हॅशटॅगही वापरला आहे.

अजय देवगन सुनील शेट्टींनी रिहानाला झापले

अजय देवगन आणि सुनील शेट्टी यांनी ट्विट करून रिहानाला अप्रत्यक्षपणे झापलं आहे. दोघांनीही आपल्या ट्विटमध्ये एकतेवर भर दिला आहे. कोणत्याही बाहेरच्या अपप्रचाराचा आपल्यावर प्रभाव पडता कामा नये, असं सांगतानाच अर्ध सत्य नेहमीच धोकादायक असतं, असं या दोघांनी म्हटलं आहे. दिग्दर्शक करण जोहरनेही शेतकरी मुद्द्यावरून होत असलेल्या विदेशी अपप्रचारावर टीका केली आहे. आपल्याला आपली एकी कायम ठेवली पाहिजे, असं सांगतानाच शेतकऱ्यांच्या समस्यांवर तोडगा निघेल, असं करण जोहर यांनी म्हटलं आहे. एकता कपूरनेही विदेशी अपप्रचारापासून सावध राहण्याचं आवाहन करतानाच सर्वांनी एकजूट राहण्याचं आवाहनही केलं आहे.

संबंधित बातम्या :

आंदोलन शेतकऱ्यांचं मग का भांडतायत हॉलीवूड Vs बॉलीवूड?

जगप्रसिद्ध पॉपस्टारच्या ट्विटला उत्तर देताना कंगना म्हणते, आंदोलन करणारे शेतकरी नाहीत तर दहशतवादी !

जगजाहीर नशा केली, न्यूड फोटो शूट केले, वादात अडकली, आता शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे रिहाना?

सकाळी पॉपस्टार, आता पॉर्नस्टार, मिया खलिफा शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे मिया?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.