‘घुसखोर हीच काँग्रेसची व्होटबँक, फोडा आणि राज्य करा अशी त्यांची रणनिती’, अमित शाहांचा घणाघात

काँग्रेसची रणनिती ही इंग्रजांसारखी फोडा आणि राज्य करा, अशी आहे, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला (Amit Shah slams Congress in Assam)

'घुसखोर हीच काँग्रेसची व्होटबँक, फोडा आणि राज्य करा अशी त्यांची रणनिती', अमित शाहांचा घणाघात
Follow us
| Updated on: Jan 24, 2021 | 6:07 PM

दिसपूर (आसाम) : “काँग्रेस आणि ऑल इंडिया डेमोक्रेटिक फंडचे संस्थापक बदरुद्दीन अजमल हे घुसखोरांसाठी सारे दरवाजे उघडतील. कारण तीच त्यांची व्होटबँक आहे. काँग्रेसची रणनिती ही इंग्रजांसारखी फोडा आणि राज्य करा, अशी आहे”, असा घणाघात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला. आसामच्या नालबारी येथे विजय संकल्प कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी घुसखोरांना फक्त भाजप सरकार रोखू शकतं, असा दावा केला (Amit Shah slams Congress in Assam).

“जे कित्येक वर्षांपासून इथे सरकारमध्ये आहेत त्यांनी आसामच्या संस्कृतीसाठी काय केलं? असा प्रश्न मला त्यांवा विचारायचा आहे. मतं गोळा करण्या व्यतिरिक्त या लोकांनी आणखी काही केलेलं नाही. एनडीएने आसासमध्ये शंकरदेव यांच्या सन्मानार्थ काही महत्त्वपूर्ण पावलं उचलली आहेत”, असं अमित शाह म्हणाले.

“काँग्रेस अनेकदा भाजपवर सांप्रदायिकतेचा आरोप करते. मात्र, तीच काँग्रेस केरळमध्ये मुस्लीम लीगसोबत आहे तर आसाममध्ये काँग्रेसने बदरुद्दीन अजमलसोबत युती केली आहे. काँग्रेस आसामला कोणत्या दिशेला घेऊन जात आहे?”, असा सवाल त्यांनी केला.

“कलम 370 ला कुणीही हात लावू शकत नव्हतं. मात्र, आम्ही त्याबाबतचा निर्णय करुन दाखवला. प्रभू श्रीरामांचे मंदिर बनवण्याबाबत देशभरातून आवाज उठत होता. काँग्रेस इंग्रजांच्या नितीवर चालत राहिली. लोकांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा, अशी त्यांची रणनिती आहे. आसाममध्ये इतके दिवस त्यांनी तेच केलं. काँग्रेसने लोकांना आपसात लढवत आसामला रक्तरंजित केलं. यामध्ये 10 हजार पेक्षा जास्त युवकांचं रक्त सांडलं आहे”, असं शाह म्हणाले (Amit Shah slams Congress in Assam).

“आसाममध्ये विकासाची गाडी धावत आहे. नवे रस्ते, रुग्णालये, कॉलेज बनत आहेत. आगामी काळात पूराच्या समस्येवरही भाजप सरकार तोडगा काढेल. आम्ही आसामात शांतता प्रस्थापित केली आहे. आम्हाला पुढचे पाच वर्ष आणखी द्या”, असं आवाहन त्यांनी केलं.

हेही वाचा : काही अदृश्य शक्तीमुळेच शेतकरी आंदोलनावर तोडगा नाही; केंद्रीय कृषी मंत्र्यांचा दावा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.