Amit Shah: राष्ट्रीय सहकारिता संमेलनाला अमित शाह संबोधित करणार, भारतासह जगभरातील सहकाराच्या जाणकारांना मार्गदर्शन

केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या दिल्लीत राष्ट्रीय सहकार संमेलनाला संबोधित करणार आहेत. सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रिपद देण्यात आलं होतं.

Amit Shah: राष्ट्रीय सहकारिता संमेलनाला अमित शाह संबोधित करणार, भारतासह जगभरातील सहकाराच्या जाणकारांना मार्गदर्शन
Amit Shah
Follow us
| Updated on: Sep 24, 2021 | 8:23 PM

नवी दिल्ली: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह उद्या दिल्लीत राष्ट्रीय सहकार संमेलनाला संबोधित करणार आहेत. सहकार मंत्रालय स्थापन झाल्यानंतर अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रिपद देण्यात आलं होतं. उद्या नवी दिल्लीतील आयजीआय स्टेडियमवर सकाळी 11 वाजता अमित शाह सहकार समेंलनात सहभागी झालेल्या व्यक्तींना संबोधित करतील. देशभरातून सहकार क्षेत्राशी संबंधित 2 हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. अमित शाह यांच्या कार्यालयानं यासंदर्भात ट्विट केलं आहे.

केंद्रीय सहकार मंत्रालयाची जुलै महिन्यात स्थापना

केंद्रीय सहकार मंत्रालयाची जुलै महिन्यात स्थापना करण्यात आली होती. सहकार मंत्रालयाचा कारभार अमित शाह यांच्याकडे देण्यात आला होता. सहकार मंत्रालयाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अमित शाह प्रथमच मोठ्या स्वरुपातील कार्यक्रमात सहभागी होत मार्गदर्शन करणार आहेत. दिल्लीतील स्टेडियमध्ये 2000 प्रतिनिधी उपस्थित असतील. तर, ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जगभरातील सहकार विषयाशी संबंधित व्यक्ती सहभागी होतील. आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे 110 देशातील प्रतिनिधी या परिषदेला ऑनलाईन पद्धतीनं हजेरी लावणार आहेत.

सहकारी संस्थांकडून आयोजन

इफको, नॅशनल कोऑपरेटिव्ह फेडरशेन ऑफ इंडिया, अमूल, सहकार भारती, नाफेड, कृभको आणि इतर संस्थांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी.एल. वर्मा, आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीचे अध्यक्ष एरिअल गार्को हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतील. अमित शाह यांनी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सहकार मंत्रालयाचा पहिला मोठा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात अमित शाह केंद्रीय सहकार मंत्रालयासंदर्भातील भूमिका आणि भविष्यातील वाटचाल यांसदर्भात महत्वाचं मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींना या निमित्तानं पहिल्यांदा केंद्रीय सहकारमंत्र्यांची भूमिका समजून घेता येणार आहे. केंद्र सरकारचं सहकार क्षेत्रासंदर्भातील धोरण देखील स्पष्ट होण्याची शक्यता आहे. हे संमेलन भारताच्या सहकार क्षेत्राला मजबूत करण्यासोबत आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळवून देण्यात महत्वाची भूमिका ठरणार आहे.

अमित शाह काय बोलणार याकडं लक्ष

केंद्रीय सहकार मंत्री यांच्या संबोधनातून देशातील सहकाराच्या विकासाचा रोडमॅप सहकार क्षेत्रातील प्रतिनिधींना मिळणार  का हे पाहावं लागणार आहे. सहकार क्षेत्रातील जाणकार मंडळीचं अमित शाह यांच्या संबोधनाकडे लक्ष लागलं आहे.

इतर बातम्या:

हॅरिस यांना आजोबांच्या आठवणी, मॉरिसन यांना समुद्री मैत्रीचं प्रतीक, तर जापानला बुद्धाचे विचार, वाचा अमेरिकेच्या दौऱ्यात मोदींनी कुणाला काय गिफ्ट दिलं!

PM Modi US Visit Second Day: जो बायडन भेट, क्वाड देशांच्या बैठकीत हजेरी, असा असेल मोदींचा अमेरिकेतील दुसरा दिवस!

Amit Shah will address first conference of cooperatives on 25 September at New Delhi IGI stadium

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.