‘सावरकर नसते तर आज आपण फक्त इंग्रजी बोलत असतो’, अखिल भारतीय राजभाषा संमेलनात गृहमंत्री अमित शाहांची वक्तव्य
जर तुलसीदास यांनी रामचरित मानस लिहिलं नसतं तर रामायण विलुप्त झालं असतं. त्याचबरोबर सावरकर नसते तर आज आपण फक्त इंग्रजीच शिकत असतो. त्यांनी सांगितलं की सावरकर यांनी हिंदी शब्दकोश लिहिला होता. इंग्रजी आमच्यावर थोपवली गेली होती. तसंच शाह म्हणाले की, हिंदी शब्दकोशासाठी काम करावं लागेल आणि तो अधिक मजबूत करावा लागेल.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. वाराणसीमध्ये अखिल भारतीय राजभाषा संमेलनाला संबोधित करताना अमित शाह यांनी आपलं मत व्यक्त केलं. त्यावेळी शाह म्हणाले की, जर तुलसीदास यांनी रामचरित मानस लिहिलं नसतं तर रामायण विलुप्त झालं असतं. त्याचबरोबर सावरकर नसते तर आज आपण फक्त इंग्रजीच शिकत असतो. त्यांनी सांगितलं की सावरकर यांनी हिंदी शब्दकोश लिहिला होता. इंग्रजी आमच्यावर थोपवली गेली होती. तसंच शाह म्हणाले की, हिंदी शब्दकोशासाठी काम करावं लागेल आणि तो अधिक मजबूत करावा लागेल. (Amit Shah’s appeal to make more use of Hindi language in All India Rajbhasha Conference)
मी स्वत: हिंदी भाषी नाही. गुजरातमधून येतो. माझी मातृभाषा गुजराती आहे. मला गुजराती बोलण्यात काही अडचण नाही. मात्र मी गुजराती एवढाच किंबहुना त्यापेक्षा अधिक हिंदी भाषेचा वापर करतो, असं शाह यांनी सांगितलं. अखिल भारतीय राजभाषा संमेलन राजधानी दिल्लीतून देशात अनेक ठिकाणी करण्याचा निर्णय आम्ही 2019 मध्ये घेतला होता. कोरोनामुळे दोन वर्षे आम्ही हे संमेलन घेऊ शकलो नाही. मात्र, मला आनंद आहे की ही नवी सुरुवात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला होत आहे. देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त देशवासियांना सांगू इच्छितो की, स्वभाषेसाठी आपलं एक लक्ष्य अडगळीत राहिलं होतं, त्याचं स्मरण करु आणि त्याला आपल्या जीवनाचा एक भाग बनवू. हिंदी आणि आपल्या सर्व मातृभाषा आणि प्रादेशिक भाषांमध्ये कुठलाही अंतर्विरोध नाही, असंही शाह म्हणाले.
‘स्वराज्य मिळालं मात्र स्वदेशी आणि स्वभाषा मागे राहिली’
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या लोकांच्या स्मृती जागवून युवा पिढीला प्रेरणा देण्यासाठी तर आहेत. त्याचबरोबर आपल्यासाठी हे संकल्पाचेही वर्ष आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी सांगितल्याचं अमित शाह म्हणाले. स्वातंत्र्य आंदोलनाचं गांधीजी यांनी जन आंदोलनात रुपांतर केलं त्यावेळी त्याचे तीन स्तंभ होते. स्वराज, स्वदेशी आणि स्वभाषा.
स्वराज्य तर मिळाले, पण स्वदेशी आणि स्वभाषा मागे राहिली. 2014 नंतर पंतप्रधान मोदी यांनी पहिल्यांदा मेक इन इंडिया आणि आता पहिल्यांदा स्वदेशीचा मुद्दा मांडून पुन्हा एकदा स्वदेशी आपलं लक्ष्य बनवून पुढे जात आहोत. त्यांनी सांगितलं की काशी हे भाषेचं गोमुख आहे. भाषेचा उगम, भाषांचं शुद्धिकरण, व्याकरण शुद्धी, कोणतीही भाषा असेल त्यात काशीचे मोठं योगदान आहे, असं शाह म्हणाले.
हिंदी प्रेमींसाठी हे संकल्पाचे वर्ष
आपण सर्व हिंदी प्रेमींसाठी हे संकल्पाचे वर्ष असले पाहिजे. जेव्हा स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा देशात राजभाषा आणि सर्व प्रादेशिक भाषांचा दबदबा असा असला पाहिजे की आपल्याला कोणत्याही परकीय भाषेचा आधार घेण्याची गरज भासणार नाही, असंही अमित शाह म्हणाले.
इतर बातम्या :
Amit Shah’s appeal to make more use of Hindi language in All India Rajbhasha Conference