केजरीवालांना अमित शाहांचे उत्तर, केवळ पंतप्रधान मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान मोदी यांचा अमित शाहा यांना पंतप्रधान करण्याची इच्छा असल्याचा दावा केला होता. त्यावर उत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी स्प्ष्ट केले की, मोदी हेच पंतप्रधान राहतील. रिटायमेंट होण्याचे स्वप्न बघू नका.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दावा केलाय की, तीन टप्प्यात पार पडलेल्या मतदानात एनडीएला 200 जागा जवळपास मिळतील. चौथ्या टप्प्यात एनडीएला मोठे यश मिळेल. एनडीएला 400 च्या पुढे जागा मिळतील. चौथ्या टप्प्यात आंध्रप्रदेश आणि तेलंगणामध्ये एनडीए पूर्ण स्वीप करणार आहे. 4 जून रोजी निकाल जाहीर होईल तेव्हा दक्षिण भारतातील भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. तेलंगणात 10 पेक्षा जास्त जागा मिळतील असा दावा त्यांनी केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वक्तव्यावर अमित शाह म्हणाले की, देशाचे नेतृत्व फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच हेच करतील. 75 व्या वर्षी निवृत्ती पंतप्रधान मोदींसाठी लागू होत नाही. केजरीवाल अँड कंपनी आणि संपूर्ण इंडी अलायन्सला सांगू इच्छितो की पंतप्रधान मोदी 75 वर्षांचे झाले याचा आनंद करण्याची गरज नाही. ७५ वर्षांनंतर पंतप्रधान होऊ शकत नाही, असे भाजपच्या घटनेत कुठेही लिहिलेले नाही. केवळ पंतप्रधान मोदीच देशाचे नेतृत्व करत राहतील. केजरीवाल यांनी दावा केला होता की पीएम मोदी अमित शहा यांना पंतप्रधान बनवू इच्छित आहेत.
गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, एका बाजूला यूपीए आघाडी आहे तर दुसऱ्या बाजूला एनडीए आहे. एकीकडे 12 लाख कोटींचे घोटाळे करणारे काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष आहेत, तर दुसरीकडे पंतप्रधान मोदी आहेत जे दिवाळीची सुट्टीही न घेता देशाच्या सीमेवर जवानांसोबत सण साजरा करत आहेत. इतर नेते उष्णता वाढली की लगेच सुट्टीवर निघून जातात. 20 वेळा लॉन्चिंग करूनही जे लॉन्च होऊ शकले नाही. आता 21व्यांदा अयशस्वी प्रयत्न सुरु आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, काँग्रेस पक्ष तुष्टीकरणाचे राजकारण करत आहे. मणिशंकर अय्यर आणि फारूख अब्दुल्ला पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असल्याचे सांगून पीओके न बोलण्याचे सांगत आहेत. पण पीओकेमधील आपला हक्क कधीही सोडणार नाही, असा भाजपचा विश्वास आहे. पीएम मोदींना 400 जागा मिळाल्या तर पीएम मोदी आरक्षण रद्द करतील असे ते म्हणत आहेत. पंतप्रधान मोदींकडे 10 वर्षांपासून पूर्ण बहुमत आहे. आम्ही आमच्या पूर्ण बहुमताचा वापर करून कलम ३७० रद्द केले, तिहेरी तलाक रद्द केले. राम मंदिर बांधण्याचे काम झाले. असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.