तिरुपतीच्या प्रसादासाठी आम्ही तूप पुरवलं नाही, अमूलला का द्यावं लागलं स्पष्टीकरण

तिरुपती बालाजीच्या मंदिरात मिळणाऱ्या लांडूच्या प्रसादावरुन सध्या वाद रंगला आहे. हा वाद तेव्हा सुरु झाला जेव्हा आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी असा आरोप केला की, मागच्या सरकारच्या काळात या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी आणि कमी दर्जाच्या वस्तू वापरल्या गेल्या. या आरोपावर माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी देखील स्पष्टीकरण दिले आहे.

तिरुपतीच्या प्रसादासाठी आम्ही तूप पुरवलं नाही, अमूलला का द्यावं लागलं स्पष्टीकरण
Follow us
| Updated on: Sep 21, 2024 | 7:05 PM

तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाचा वाद आणखीनच चिघळत चालला आहे. तिरुपती मंदिराकडून दिल्या जाणाऱ्या प्रसाद लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी वापरल्याच्या दावा केल्यानंतर आता अमूलने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. अमूलने निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानला (TTD) तूप दिले नाही. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याबद्दल पोस्ट केल्यानंतर, Amul.co.pe ने ट्विटरवर एक निवेदन पोस्ट केले आणि स्पष्टीकरण दिले आहे. ज्यामध्ये अमूलने  तिरुपती मंदिराला कधीही तूप पुरवले नसल्याचे म्हटले होते. अमूलच्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही तिरुपती मंदिराला अमूल तूप कधीच पुरवले नाही. आम्ही हेही स्पष्ट करू इच्छितो की, ‘आमच्या अत्याधुनिक उत्पादन केंद्रांमध्ये अमूल तूप दुधापासून बनवले जाते, जे ISO प्रमाणित आहेत. अमूल तूप हे उच्च दर्जाच्या शुद्ध दुधाच्या फॅटपासून बनवले जाते. आमच्या दुग्धशाळांमधून खरेदी केलेल्या दुधाची FSSAI द्वारे निर्दिष्ट केल्यानुसार भेसळ शोधण्यासह कठोर गुणवत्ता तपासणी केली जाते. सोशल मीडियावर अमूलकडून तूप पुरवल्या गेल्याची पोस्ट व्हायरल होत असल्याने कंपनीला यावर स्पष्टीकरण द्यावे लागले.

लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीचा वापर?

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दावा केल्यानंतर दोन दिवसांनी अमूलचे हे स्पष्टीकरण आले आहे. जगन मोहन रेड्डी मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारच्या काळात तिरुपतीच्या श्री व्यंकटेश्वर मंदिरातून दिल्या जाणाऱ्या लाडूमध्ये प्राण्यांच्या चरबीसह निकृष्ट घटकांचा वापर करण्यात आला होता. असा आरोप करण्यात आला आहे. तिरुपती लाडू प्रकरणाला उत्तर देताना आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी म्हणाले की, टीडीपी धार्मिक बाबींचे राजकारण करत आहे.

जगन मोहन रेड्डी यांची सरकारवर टीका

जगन मोहन रेड्डी म्हणाले की, निविदा प्रक्रिया दर सहा महिन्यांनी होते आणि पात्रतेचे निकष अनेक दशकांपासून बदललेले नाहीत. पुरवठादाराने NABL प्रमाणपत्र आणि उत्पादन गुणवत्ता प्रमाणपत्र प्रदान करणे आवश्यक आहे. टीटीडी तुपाचे नमुने घेते आणि फक्त तेच पदार्थ वापरले जातात जे प्रमाणन प्रक्रिया पास करतात. टीडीपी धार्मिक बाबींचे राजकारण करत आहे. आमच्या नियमानुसार, आम्ही 18 वेळा उत्पादने नाकारली आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री नायडू यांच्याशी बोलून या विषयावर संपूर्ण अहवाल मागवला. केंद्र सरकार या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करेल, असे ते म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.