Delhi Blast : राजधानी दिल्ली पुन्हा स्फोटाने हादरली; इमारतीचे दोन मजले कोसळले
ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली. एलपीजी गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु करण्यात आले.
नवी दिल्ली : राजधानी दिल्ली गुरुवारी रात्री पुन्हा एकदा स्फोटाने हादरून गेली. छतरपूर भागात एलपीजी गॅस लिकेज (Gas Leakage)मुळे हा स्फोट झाल्याचे समजते. हा स्फोट (Blast) प्रचंड तीव्रतेचा होता. त्यामुळे दुर्घटना घडलेल्या इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Loss) झाले आहे. दुर्घटनेत तीन जण जखमी झाले असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना छतरपूरच्या सी ब्लॉक फेज 1 मधील राजपूर भागात घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले.
#UPDATE | Second and third floor of a building damaged in blast due to LPG leakage, in Chhatarpur area of Delhi. Three people got injured and sent to hospital. pic.twitter.com/fQmnaPC12i
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) May 26, 2022
अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य
ही घटना रात्री नऊच्या सुमारास घडली. एलपीजी गळतीमुळे हा स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये घराच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचाव कार्य सुरु करण्यात आले. स्फोटाच्या आवाजाने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. राजधानी दिल्लीमध्ये अलीकडेच दहशतवाद्यांकडून करण्यात आलेल्या घातपाताच्या प्रयत्नांचा उलगडा झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा स्फोट अपघात आहे कि घातपात, याबाबत स्थानिक रहिवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. घातपाताच्या शक्यतेने अनेक नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे. या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
राजधानीत गेल्या काही दिवसांत आगीच्या अनेक घटना
विशेष म्हणजे राजधानी दिल्लीत गेल्या काही दिवसांत आगीच्या अनेक घटना घडल्या आहेत. 19 मेपर्यंत उष्णतेच्या लाटेच्या परिस्थितीतच राजधानी दिल्लीत आगीशी संबंधित 2000 हून अधिक घटना घडल्या आहेत. आगीच्या घटनांमध्ये 42 जणांचा मृत्यू झाला असून 117 जण जखमी झाले आहेत. दिल्ली अग्निशमन सेवा विभागाने (DFS) आज ही आकडेवारी जाहीर केली. अग्निशमन दलाच्या आकडेवारीनुसार, या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या 19 दिवसांत आगीशी संबंधित 2,145 घटना घडल्या. त्यात 117 लोक जखमी झाले आणि 42 लोकांचा मृत्यू झाला. (An explosion caused by an LPG leak in Delhi caused two floors of a building to collapse)