धूमसते काश्मीर, 72 तासात 12 दहशतवाद्यांना कंठस्नान, वाचा 4 ऑपरेशन्सची माहिती सविस्तर

शनिवारी दहशतवाद्यांकडून एका भारतीय जवानाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हे दहशतवादी बिजबेहरा येथील सेमथान परिसरात लपून बसले होते. | Indian Army

धूमसते काश्मीर, 72 तासात 12 दहशतवाद्यांना कंठस्नान, वाचा 4 ऑपरेशन्सची माहिती सविस्तर
Follow us
| Updated on: Apr 11, 2021 | 3:58 PM

श्रीनगर: जम्मू आणि कश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलांसबोत रात्रभर सुरु असलेल्या दोन चकमकींमध्ये पाच दहशतवादी ठार मारले गेले आहेत. याच दहशतवाद्यांनी शनिवारी अनंतनाग जिल्ह्यात भारतीय जवानाची हत्या केली होती. यानंतर जम्मू-काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहरा ऑपरेशन समाप्त झाल्याची घोषणा केली. (operation at Bijbehara has concluded 12 terrorists neutralised by Indian Army )

ही चकमक पकडून गेल्या 72 तासांमध्ये भारतीय सुरक्षादलांनी वेगवेगळ्या ठिकाणी एकूण 12 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. यामध्ये त्राल आणि शोपियानमध्ये मारण्यात आलेल्या 7, हद्दीपुरा येथील चकमकीत ठार झालेल्या 3 आणि बिजबेहरा ऑपरेशनमधील लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांचा समावेश आहे.

शनिवारी दहशतवाद्यांकडून एका भारतीय जवानाची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर हे दहशतवादी बिजबेहरा येथील सेमथान परिसरात लपून बसले होते. लष्कराला दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर शनिवारी रात्री भारतीय लष्कराने शोध मोहीम सुरु केली. त्यावेळी दहशवादी आणि भारतीय जवान आमनेसामने आले आणि चकमकीला सुरुवात झाली.

लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री

शोपियान आणि अनंतनाग जिल्ह्यात शनिवारी रात्री सुरु झालेल्या चकमकी बराच वेळ सुरु होत्या. यापैकी एका दहशतवाद्याला काल रात्रीच मारण्यात आले. रविवारी सकाळी पुन्हा चकमक सुरु झाली. त्यानंतर भारतीय जवानांनी उर्वरित दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्याचे आवाहन

या दहशतवाद्यांनी बिजबेहराच्या गोरीवन परिसरात शनिवारी हवालदार मोहम्मद सलीम अखून यांची त्यांच्या घराबाहेर हत्या केली होती. त्यानंतर हे दहशतवादी सेमथान परिसरात लपून बसले होते. मात्र, भारतीय जवानांना त्यांचा खात्मा करुन आपल्या साथीदाराच्या हत्येचा बदला घेतला.

तर शोपियान येथील चकमकीत सात दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. हा युवक नुकताच दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. त्यामुळे भारतीय लष्कराने त्याला आत्मसमर्पणाची संधी दिली होती. दहशतवाद्याच्या आई-वडिलांनीही त्याला समजावून सांगितले. मात्र, इतर दहशतवाद्यांनी त्याला आत्मसमर्पण करुन दिले नाही.

(operation at Bijbehara has concluded 12 terrorists neutralised by Indian Army )

MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.