अनंत अंबानी यांनी बागेश्वर बाबांना आणण्यासाठी या देशात पाठवले खास विमान, म्हणाले तुम्ही फक्त तयार राहा…

बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र शास्त्री यांची सध्या देशभरात चर्चा आहे. मुंबईत देखील त्यांची लोकप्रियता खूप वाढली आहे. अनंत अंंबानींच्या लग्नात सहभागी होण्यासाठी त्यांना आमंत्रण पाठवण्यात आले होते. पण जेव्हा त्यांनी निमंत्रण पाठवले तेव्हा ते परदेशात होते. त्यामुळे अनंत अंबानी यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवले होते.

अनंत अंबानी यांनी बागेश्वर बाबांना आणण्यासाठी या देशात पाठवले खास विमान, म्हणाले तुम्ही फक्त तयार राहा...
Follow us
| Updated on: Jul 15, 2024 | 7:26 PM

अनंत अंबानी यांच्या लग्नात जगभरातील अनेक मोठी लोकं सहभागी झाली होती. जागातील अनेक लोकांना यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अंबानी कुटुंबाने देशभरातील संतांना देखील आमंत्रित केले होते. या लग्नाला बागेश्वर धामचे प्रमुख पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनीही हजेरी लावली होती. अनंत अंबानी यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना ऑस्ट्रेलियाहून मुंबईत आले होते. यासाठी अनंत अंबानी यांनी त्यांच्यासाठी खास विमान पाठवले होते. नियोजित कार्यक्रमानुसार, बाबा 17 जुलैपर्यंत ऑस्ट्रेलियात त्यांचा कार्यक्रम होता. पण ते 13 जुलै रोजी अंबानींच्या लग्नात सहभागी होण्यासाठी आले होते. यानंतर ते पुन्हा ऑस्ट्रेलियाला परतले.

ऑस्ट्रेलियात सुरु होती कथा

पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, जेव्हा त्यांना अनंत अंबानी यांच्या आशीर्वाद समारंभाचे निमंत्रण मिळाले तेव्हा ते ऑस्ट्रेलियात कथा करत होते. सुरुवातीला ते ऑस्ट्रेलियात असल्यामुळे येऊ शकणार नाही, असे त्यांनी सांगितले. मात्र अंबानी कुटुंबाने त्यांच्यासाठी खास विमान पाठवले. प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, आम्ही त्यांना सांगितले की आम्ही नंतर आशीर्वाद देऊ. पण त्यांना ते मान्य नव्हते. ते म्हणाले की, गुरुजी, तुम्ही कथा सांगा, प्रायव्हेट जेट तुमच्यासाठी तयार राहिल.

विशेष विमानाने आले मुंबईत

धीरेंद्र शास्त्री यांनी सांगितले की, ते विशेष विमानाने मुंबईत आले होते. 12 तासांच्या प्रवासानंतर मुंबईत पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम प्रसाद घेतला. संध्याकाळी सर्व संतांसह त्यांनी शंकराचार्यजींकडून आशीर्वाद घेतला आणि अनंत-राधिका यांनाही आशीर्वाद दिला आणि तेथून निघाले.

बाबा मुंबईत लोकप्रिय

अंबानी कुटुंबाच्या या विशेष सोहळ्यात देशातील अनेक नामवंत व्यक्ती आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरही सहभागी झाले होते. पण या सगळ्यांमध्ये बागेश्वर बाबा पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री स्वतःचा वेगळा ठसा उमटवत आहेत. संपूर्ण विवाह सोहळ्यावर त्यांनी वर्चस्व गाजवले. त्यांनी अनेक बड्या व्यक्तींची भेट घेतली. चित्रपटसृष्टीपासून ते व्यावसायिक जगतापर्यंतचे लोक येथे आले होते. अमिताभ बच्चन यांना देखील  भेटताना ते दिसत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही त्यांचे आशीर्वाद घेतले.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.