अनंत अंबानी यांची घड्याळ पाहून अब्जाधीश मार्क झुकरबर्गच्या पत्नीचे उडाले ‘होश’
Anant-Radhika Pre Wedding: प्री वेंडिग कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी, आकाश अंबानी आणि फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी एकत्र उभे आहेत. त्यांच्या गप्पा रंगल्या आहेत.
जामनगर | दि. 4 मार्च 2024 : सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असणारा व्हिडिओ मेटा म्हणजे फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग, त्यांची पत्नी प्रिसला यांचा आहे. अनंत अंबानी यांच्या प्री वेडिंग समारंभात आलेल्या मार्क झुकरबर्ग आणि त्यांच्या पत्नीची चांगली चर्चा रंगली आहे. समारंभास भारतातूनच नव्हे तर जगभरातून दिग्गज आले. त्यामुळे मुकेश अंबानी यांचा जागतिक पातळीवर असणारा दबदबा समोर आला. मायक्रसॉफ्टचे बिल गेट्स, इवांका ट्रंप, लक्ष्मी मित्तल, गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यासारख्या दिग्गजांची मोठी यादी यामध्ये आहे.
काय आहे व्हिडिओ…
प्री वेंडिग कार्यक्रमाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या व्हिडिओमध्ये अनंत अंबानी, आकाश अंबानी आणि फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी एकत्र उभे आहेत. त्यांच्या गप्पा रंगल्या आहेत. अनंत यांच्याशी गप्पा करताना प्रिसला यांचे लक्ष अनंत अंबानी यांच्या घड्याळाकडे गेले. ते घड्याळ पाहून त्यांना खूप आश्चर्य वाटले. त्या ते पाहू लागल्या आणि अधिक चौकशी करु लागल्या.
किती आहे किंमत
अनंत अंबानी यांचे महागडे घड्याळ आहे. त्या घड्याळाची किंमत १४ ते १६ कोटी असल्याचे सांगितले जात आहे. ऑडेमार्स पिगट रॉयल ओक कंपनीची घड्याळ घातली आहे. इंडियन होरोलॉजीच्या इंस्टाग्राम पेजनुसार, या मनगटाच्या घड्याळात रिव्हर्सिबल केस, स्वतंत्र डायल आणि सहा पेटंट इनोव्हेशन्स यासारखी अनेक वैशिष्ट्ये आहेत. रिपोर्टनुसार, या स्पेशल एडिशन घड्याळात मौल्यवान हिरे जडले आहेत.
Mark Zuckerberg & his wife Priscilla was surprised to see Anant Ambani's watch. Anant was seen carrying beautiful audemars piguet royal oak open worked skeleton worth INR 14 crore. 🤑#AnantRadhikaWedding | #AnantAmbani pic.twitter.com/DEql5XFWUA
— Radhika Chaudhary (@Radhika8057) March 3, 2024
अनंत अंबानी यांच्या या घड्याळाबद्दल प्रिसलाला धक्का बसला. यावेळी मार्क झुकरबर्ग यांनी प्रिसला घड्याळांची खूप आवड असल्याचे अनंत अंबानी यांना सांगितले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्स अनेक मीम्सही बनवत आहेत.
अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग समारंभात जगभरातील दिग्गज आले होते. तसेच विविध पदार्थांची रेलचेल होती. जामनगरमध्ये सुरू असलेल्या या तीन दिवसांच्या कार्यक्रमास जगभरातून एक हजार लोक आले होते. या भव्य कार्यक्रमात अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि आमिर खान सारखे सुपरस्टारही सामील झाले होते.