हायकोर्टाचा अवमान 8 आयएएस अधिकाऱ्यांना महागात, 14 दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावताच ऑफिसर नरमले, नेमकं प्रकरण काय?
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) हायकोर्टानं आज न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) केल्याप्रकरणी 8 आयएएस अधिकाऱ्यांना (IAS Officers) दोषी ठरवलं आहे.
विजयवाडा : आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) हायकोर्टानं आज न्यायालयाचा अवमान (Contempt of Court) केल्याप्रकरणी 8 आयएएस अधिकाऱ्यांना (IAS Officers) दोषी ठरवलं आहे. हायकोर्टानं अधिकाऱ्यांना 2 आठवड्याचा तुरुंगवास सुनावला आहे. अधिकाऱ्यांनी माफी मागितल्यानंतर हायकोर्टानं निकालपत्रात बदल केला. आठ आयएएस अधिकाऱ्यांना वर्षातील प्रत्येक महिन्यात एक दिवस कल्याणकारी हॉस्टेलमध्ये सामाजिक सेवा करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांना कोर्टाचा एका दिवसाचा खर्च देण्यास सांगण्यात आलं आहे. हायकोर्टानं यापूर्वी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना शाळांच्या ठिकाणी ग्रामसचिवालय बांधण्यास मनाई केली होती. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली होती. हायकोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन झाल्याचं याचिकाकर्त्यांनी कोर्टाच्या लक्षात आणून दिलं यानंतर हायकोर्टानं आयएएस अधिकाऱ्यांना फटकारलं आहे.
नेमकं प्रकरण काय?
हायकोर्टानं आयएएस अधिकारी गोपाल कृष्ण द्विवेदी, बुदिती राजशेखर, विजया कुमार, श्यामला राव, श्री लक्ष्मी, गिरीजा शंकर, वी. छिन्ना वीरबंडारू, एनएम नायक यांच्यावर हायकोर्टानं संताप व्यक्त केला. या आयएएस अधिकाऱ्यांना कोर्टाचा आदेश नाकारला होता. यानंतर संतप्त झालेल्या हायकोर्टानं अधिकाऱ्यांना दोन आठवड्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.
एएनआयचं ट्विट
Andhra Pradesh HC found 8 IAS officers guilty of contempt of court case against them & sentenced them to a two-week jail term. The convicted officers apologised to HC, upon which the HC revised its judgement & directed them to do social service at welfare hospitals for one year.
— ANI (@ANI) March 31, 2022
आयएएस अधिकाऱ्यांनी माफी मागितली
हायकोर्टानं यापूर्वी एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना शाळांच्या ठिकाणी ग्रामसचिवालय बांधण्यास मनाई केली होती. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली होती. याचिकाकर्त्यांनी यानंतर आंध्र प्रदेश हायकोर्टाचा आदेश डावलण्यात आल्याची बाब लक्षात अणून दिली. त्यांसदर्भातील पुरावे देखील कोर्टात सादर करण्यात आले होते. यानंतर हायकोर्टानं आयएएस अधिकाऱ्यांना सुनावलं आहे. यानंतर आयएएस अधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे.
इतर बातम्या
टायगर इज बॅक नाहीतर भालू इज बॅक, ‘नाणार’वरून सतीश सावंतांचे नितेश राणेंवर जहाल आसूड