ओवीसींच्या ‘कंडोम’ विधानावरुन भाजप नेत्यानं एकाच वाक्यात दिलं उत्तर…
कंडोम सर्वात जास्त कोण वापरतं? त्यातही मुस्लिम समाज पुढारलेला आहे असंही ते म्हणाले. मात्र याबद्दल मोहन भागवत बोलणार नाहीत असंही त्यांनी सांगितले.
नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून कधी ओवेसी भाजपवर तुटून पडत आहेत, तर कधी भाजप ओवेसींनी धारेवर धरत आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल-मुस्लिमीन (AIMIM) या पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी दावा केला होता की, दोन मुलांमधील जन्मातील अंतर राखण्यासाठी मुस्लिम समाजच कंडोमचा सर्वाधिक वापर करतो असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. त्यावेळी त्यांनी हेही सांगितलं होतं की, त्यामुळे देशातील मुस्लिमांची लोकसंख्याही कमी होत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी लोकसंख्येच्या असंतुलनाबाबत केलेल्या वक्तव्यावरुन त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
त्यामुळे त्यांचा बचाव करण्यासाठी आणि ओवेसींच्या या वक्तव्याचा समाचार घेण्यासाठी भाजप नेते अनिल विज यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले की, ही लोकसंख्या आणखी कमी करायला हवी.ते म्हणाले हणाले की, भारतात मुस्लिमांची लोकसंख्या कमी होत आहे.
तसे असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. मात्र त्याही पेक्षा अजून ती लोकसंख्या कमी करा आणि ‘हम दो हमारे दो’ वर घेऊन जा.”
याआधी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी म्हटले होते की, भागवत यांनी लोकसंख्या वाढीबाबत चर्चा करताना त्यांनी आधी आकडेवारी मांडावी.
ते म्हणाले, मुस्लिमांची लोकसंख्या वाढत नाही, आणि त्याची काळजी तुम्ही करू नका. आमची लोकसंख्या कमीच होत आहे. मुस्लिम समाजातील प्रजनन दरही आता कमी होत आहे.
दोन मुलांना जन्म देण्यात जास्त अंतर कोण राखते हे तुम्हाला माहिती आहे का ? असा सवाल करत त्यांनी ते मुस्लिम लोकच करतात असं सांगितलं होतं.
तर कंडोम सर्वात जास्त कोण वापरतं? त्यातही मुस्लिम समाज पुढारलेला आहे असंही ते म्हणाले. मात्र याबद्दल मोहन भागवत बोलणार नाहीत असंही त्यांनी सांगितले.
लोकसंख्येबाबत बोलताना मोहन भागवत म्हणाले होते की, भारताने व्यापक विचार करुन लोकसंख्येचं धोरण तयार केले पाहिजे आणि हे धोरण सर्व समुदायांना समान रितीने लागूही केले पाहिजे.