Anju Pakistan | ‘माझी सीमासोबत तुलना नको, मी भारतात जाऊन…’, अंजूची पाकिस्तानातून प्रतिक्रिया

Anju Pakistan | मुलं, नवरा असताना पाकिस्तानी प्रियकर नसरुल्लासाठी देश सोडणारी अंजू काय म्हणाली?. पाकिस्तानात गेलेल्या अंजूने एका खासही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली सर्व कथा सांगितली.

Anju Pakistan | 'माझी सीमासोबत तुलना नको, मी भारतात जाऊन...', अंजूची पाकिस्तानातून प्रतिक्रिया
Anju-seema haider love story
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 12:33 PM

नवी दिल्ली : ‘माझं प्रकरण सीमा हैदर सारखं नाहीय. मी फक्त इथे फिरण्यासाठी आलीय…’ असं राजस्थान भिवाडीमधून पाकिस्तानात आलेल्य अंजूने म्हटलय. नसरुल्ला सोबत साखरपुडा आणि लग्नाबाबत जी चर्चा सुरु आहे, ते सर्व चुकीच आहे. वाढवून-चढवून गोष्टी सांगितल्या जात आहेत असं अंजू म्हणाली. पाकिस्तानातून भारतात आलेल्या सीमा हैदरनंतर आता आणखी एक प्रकरण समोर आलय. हे राजस्थानच प्रकरण आहे.

फेसबुक फ्रेंडला भेटण्यासाठी पाकिस्तानात गेलेल्या अंजूने एका खासही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आपली सर्व कथा सांगितली. अंजूने स्पष्टपणे सांगितल की, “मी जेव्हा पाकिस्तानातून भारतात परत येईन, तेव्हा नवऱ्यापासून विभक्त होईन. कारण माझे आधीपासूनच त्याच्यासोबत संबंध खराब आहेत” पाकिस्तानी मित्र नसरुल्लासोबत लग्न करण्याच्या वृत्ताचा इन्कार केला.

अंजू पाकिस्तानात का गेली?

काही दिवसांपूर्वी 35 वर्षांची अंजू आपल्या घरातून निघाली व थेट पाकिस्तानात जाऊन पोहोचली. मी नवऱ्याला जयपूरला जाण्याविषयी बोलली होती, असं तिने इंटरव्यूमध्ये सांगितलं. अमृतसरच्या वाघा बॉर्डरवरुन ती पाकिस्तानात पोहोचली. इथे फक्त एका लग्नाला उपस्थित राहण्यासाठी आली आहे. हा फिरण्यासारखा भाग होता, म्हणून इथे आले असं अंजू म्हणाली.

कथित प्रियकराबद्दल अंजू काय म्हणाली?

अंजूने नसरुल्लासोबत झालेल्या मैत्रीबद्दलही सांगितलं. “2 वर्षांपूर्वी फेसबुकवर आमची मैत्री झाली. कामाबाबत आमच्यात बोलण सुरु झालं होतं. त्यानंतर मैत्री झाली. त्यानंतर मी इथे आली. माझी सीमा हैदरसोबत तुलना करणं चुकीच आहे” असं तिने सांगितलं.

नवऱ्याबद्दल अंजूने काय सांगितलं?

भिवाडीमध्ये असलेल्या आपल्या कुटुंबाबद्दल अंजूने महत्वाची माहिती दिली. “मला माझ्या पतीपासून वेगळ व्हायच असून मला फक्त माझ्या मुलांसोबत रहायच आहे. माझे सुरुवातीपासून नवऱ्याबरोबर चांगले संबंध नव्हते. मी नाईलाजाने त्यांच्यासोबत आहे. मी आतापर्यंत नवऱ्यासोबत राहत होते. पण आता परत गेल्यानंतर मला स्वतंत्र रहायच आहे” असं अंजू म्हणाली. अंजू प्रकरणात आणखी काय अपडेट?

अंजूच्या नवऱ्याने अजून याबद्दल पोलिसात तक्रार दिलेली नाही. अंजूने फक्त मला जयपूरला जाणार असल्याच सांगितलं होतं, अस तिचा नवरा म्हणाला. पाकिस्तानात जाण्यासाठी तिला व्हिसा कसा मिळाला? या बद्दल आपल्याला माहित नाही, असं अंजूचा नवरा म्हणाला.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.