Anju-Nasrullah Love Story | पाकिस्तानातून भारतात परतण्यात अंजूसमोर पाच अडचणी कुठल्या?
Anju-Nasrullah Love Story | अंजूच लग्न झालं होतं. तिला नवरा, मुलं होती. त्यांना सोडून प्रेमासाठी ती पाकिस्तानात पोहोचली. अंजूची स्टोरी सीमा हैदर सारखी आहे.
इस्लामाबाद : नसरुल्लाहसाठी पाकिस्तानात गेलेली अंजू ऊर्फ फातिमा काही दिवसात भारतात परतणार असं बोललं जातं होतं. पण आता तिचा नवरा नसरुल्लाहने जे म्हटलय, त्यावरुन ती निकट भविष्यात अंजू भारतात परतण्याची शक्यता दिसत नाहीय. अंजू भारतात येईल का? ती भारतात येणार की नाही? या बद्दल सध्या ठामपणे काही सांगता येणार नाही. अंजूच लग्न झालं होतं. तिला नवरा, मुलं होती. त्यांना सोडून प्रेमासाठी ती पाकिस्तानात पोहोचली. अंजूची स्टोरी सीमा हैदर सारखी आहे. सीमा हैदर भारतीय प्रियकरासाठी पाकिस्तानातून भारतात आली.
अंजूच्या भारतात परतण्याबद्दल नसरुल्लाह काय म्हणाला?
अंजू आणि नसरुल्लाह मागच्या काही दिवसांपासून भारतीय मीडियापासून लांब राहत होते. मागच्या शनिवारी अंजूचा नवरा नसरुल्लाह एका भारतीय वृत्तवाहिनीशी बोलला. नसरुल्लाहने पहिल्यांदा खुलेपणाने मान्य केलं की, अंजूने फक्त धर्मच बदललेला नाही. त्याचा अंजूसोबत निकाह झालाय. अंजू भारतात कधी परतणार असं विचारलं. त्यावर तो म्हणाला की, अंजूच्या कुटुंबाला भारतात भरपूर त्रास झाला. ती तिथे आली, तर तिच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे सध्या ती येणार नाही.
अंजूचा मोहऱ्यासारखा वापर?
सीमा हैदरने सुद्धा पाकिस्तानात न परतण्यासाठी तिच्या जीवाला धोका असल्याच कारण दिलं होतं. आता अंजू सुद्धा तेच बोलतेय. अंजूला मोहऱ्यासारख वापरुन पाकिस्तानातून भारतविरोधी अजेंडा चालवला जात आहे, असं वाटतं.
अंजूचा व्हिसा वाढवण्यात आलाय ?
अंजूला मंजूर झालेला व्हिसा 20 ऑगस्टपर्यंतचा आहे. त्यानंतर ती पाकिस्तानात कशी राहू शकते? अंजूचा पती नसरुल्लाहने एका व्हायरल व्हिडिओमध्ये तिचा व्हिसा वाढवण्यात आलाय असं सांगितलं. अंजूचा व्हिसा कालावधी वाढवण्यासाठी ते इस्लामाबादला गेले होते.
नसरुल्लाह का भडकला?
अंजू आणि नसरुल्लाह विरोधात तिचा पती अरविंदने भारतात FIR नोंदवलाय. त्या प्रश्नावर नसरुल्लाह भडकला. FIR ने काय होतं? मी कशाला घाबरत नाही. अंजूने कुटुंबीयांना कुठलीही कल्पना न देता पाकिस्तानात जाऊन निकाह केला, या प्रश्नावर नसरुल्लाहने याने काही फरक पडत नाही असं उत्तर दिलं. भारतात आल्यास अंजूसमोर काय अडचणी?
अंजूचा व्हिसा अजून दोन महिन्यांसाठी वाढवण्यात आला असेल, तर तिला चिंता करण्याच कारण नाही. यामुळे अंजूवर भारतात परतण्याचा दबाव नसेल, त्याशिवाय तिला कुठला कायदेशीर धोकाही नाहीय. अंजू भारतात आली, तर तिच्या अडचणी वाढू शकतात. कारण तिच्यावर इथे FIR दाखल झालाय.