AAP Free Power Punjab : केजरीवालांनी बोललेलं केलं, पंजाबमध्ये 300 यूनिट वीज फ्री, महाराष्ट्रात पैसे देऊनही लोड शेडींग
पंजाबमध्ये भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखाली आपचे सरकार सत्तेत आले आहे. भगवंत मान यांनी सत्तेवर येताच निवडणूक काळात करण्यात आलेलया घोषणांच्या अंमलबजावणीचा धडाका लावला आहे.
पंजाबमध्ये भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांच्या नेतृत्वाखाली आपचे सरकार सत्तेत आले आहे. भगवंत मान यांनी सत्तेवर येताच निवडणूक काळात करण्यात आलेलया घोषणांच्या अंमलबजावणीचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री मान यांना सत्तेत येऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला आहे. यानिमित्त आता पंजाब सरकारकडून (Punjab Government) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील प्रत्येक घरात 300 यूनिट पर्यंत वीज मोफत (Free electricity) देण्याची घोषणा मान सरकारकडून करण्यात आली आहे. येत्या एक जुलैपासून पंजाबमधील प्रत्येक घरात 300 यूनिटपर्यंत मोफत वीज देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल असे बोलले जात आहे. सोबतच पंजाब सरकारकडून आपल्या 30 दिवसांच्या कार्यकाळाचे रिपोर्ट कार्ड देखील जारी करण्यात आले आहे. पंजाब सरकारने वृत्तपत्रांमध्ये जाहिराती छापून एक जुलैपासून प्रत्येक घरात 300 यूनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे.
पंजाब सरकारकडून 30 दिवसांचे रिपोर्ट कार्ड जारी
पंजाब सरकारने वृत्तपत्रांमध्ये जाहिराती प्रकाशीत करून, प्रत्येक घरात 300 यूनिटपर्यंत वीज मोफत देण्याची घोषणा केली आहे. येत्या एक जुलैपासून निर्णयाची अंमलबजावणी होईल असे देखील सांगण्यात आले आहे. मात्र याबाबत अद्याप पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मान यांनी यापूर्वी एक दावा केला होता. त्यांनी म्हटले होते की, 16 एप्रिल रोजी पंजाब सरकार जनतेला मोठे गिफ्ट देणार आहे, आणि आज मान सरकारकडून मोफत वीजेची घोषणा करण्यात आली आहे. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार निर्णय जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री मान यांनी आपचे सर्वेसर्वा अरवींद केजरीवाल यांच्याशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे. केजरीवाल यांच्याशी चर्चा केल्यानंतरच हा निर्णय घेण्यात आला आहे. सोबतच मान सरकारकडून 30 दिवसांचे रिपोर्ट कार्ड जारी करण्यात आले असून, त्यांनी या तीन दिवसांत काय कामे केली याची माहिती देण्यात आली आहे.
पंजाबमध्ये मोफत वीज महाराष्ट्राचे काय?
एकीकडे भगवंत मान यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने तेथील जनतेला मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे. या घोषणेनुसार आता पंजाबमधील जनतेला 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. दुसरीकडे महाराष्ट्रात कोळशाची टंचाई निर्माण झाल्याने पैसे देऊन देखील वीज मिळत नसल्याचे चित्र आहे. वीजेच दर देखील अव्वाच्या सव्वा वाढवण्यात आले आहेत. कोळसा नसल्याने राज्यावर वीज संकट गडद झाले असून, ग्रामीण भागात भारनियमनाला सुरुवात झाली आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचा कोणताही एक फिक्स टाईम नसल्याने नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
संबंधित बातम्या
Crime| एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा खून, तीन मुलींसह पतीची हत्या, प्रयागराजमध्ये खळबळ
Supreme Court : डॉक्टरांना संरक्षण द्या; मेडिकल असोसिएशनचे सुप्रीम कोर्टाला साकडे