‘जगात लवकरच आणखी एक मोठा धर्म येणार’; भारतातील सर्वात मोठ्या इमामांचं भाकीत, म्हणाले ईदपूर्वीच मला…
भारतामधील एका मोठ्या इमामांनी केलेल्या दाव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे, जगात लवकरच एक मोठ्या धर्माचा उदय होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

भारतामधील एक मोठे इमाम डॉ. इमाम उमेर इलयासी यांनी मोठं भाकीत केलं आहे. सध्या त्यांच्या या दाव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. लवकरच जगामध्ये एक नवा धर्म उदयास येणार आहे, असं इलयासी यांनी म्हटलं आहे. हा नवा धर्म मुस्लीम, यहुदी आणि ख्रिश्चन समाजाला जोडणारा असणार आहे. त्यांनी पुढे बोलताना असा दावा देखील केला आहे की, यासाठी संयुक्त अरब अमीरातमधील अबू धाबी येथे एक सेंटर देखील तयार करण्यात आलं आहे. या धर्माच्या माध्यमातून या तीनही धर्माला जोडण्याची तयारी सुरू झाली आहे. मुस्लीम, यहूदी आणि ख्रिश्चन यांचा फार जवळचा संबंध आहे, मात्र तरी देखील ते आपसात भांडत असतात. आता भांडणाला पूर्णपणे समाप्त करण्यासाठी संपूर्ण जगात तयारी सुरू झाली आहे, असं इमाम उमेर इलयासी यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की,या नव्या धर्माचं नाव इब्राहिम एक फेथ असं असेल. येत्या काळात हा नवा धर्म उदयास येईल. ज्याची तयारी जवळपास झाली आहे.मुस्लीम, यहूदी आणि ख्रिश्चन या धर्मांची मुळं एकच आहेत, मात्र तरी देखील हे तीनही धर्म आपसात भांडत असतात. त्यामुळे त्यांच्या वादावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जगात या नव्या धर्माचा उदय होणार आहे. या धर्माच्या माध्यमातून तीनही धर्माचे लोक एक होतील. मात्र हा धर्म कधी येणार? कसा येणार याबाबत मला माहिती नाही, असा दावा त्यांनी केला आहे.
इमाम इलयासी यांनी म्हटलं की, मला रमजान ईदपूर्वीची याची जाणीव झाली होती. मुस्लीम, यहूदी आणि ख्रिश्चन या धर्मांची मुळं एकच आहेत, मात्र तरी देखील हे तीनही धर्म आपसात लढत असतात. या तीनही धर्माला एकत्र करण्याचा हा मार्ग असू शकतो.या तीनही धर्मांना जर एकत्र करायचे असेल तर एकच मार्ग आहे तो म्हणजे ‘इब्राहिमिक फेथ’ इब्राहिमिक फेथचा लवकरच उदय होईल, हा धर्म या तीनही धर्मांना एकत्र करेल असं भाकीत डॉ. इमाम उमेर इलयासी यांनी वर्तवलं आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)