इंडिया आघाडीला आणखी एक झटका लागण्याची शक्यता, हा पक्ष भाजपच्या संपर्कात?

| Updated on: Jan 25, 2024 | 3:29 PM

India alliance : इंडिया आघाडीला पुन्हा एकदा मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण तिसरा पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. याआधी आप आणि तृणमुल काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. त्यामुळे काँग्रसच्या प्रयत्नांना मोठा झटका लागला आहे.

इंडिया आघाडीला आणखी एक झटका लागण्याची शक्यता, हा पक्ष भाजपच्या संपर्कात?
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीआधी इंडिया आघाडीला आधीच दोन धक्के बसले आहे. त्यानंतर आता इंडिया आघाडीला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. बुधवारी ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्यांचं स्पष्ट केलं. त्यानंतर आम आदमी पक्षाने देखील पंजाबमध्ये सर्व जागा स्वबळावर लढवणार असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला होता. आता बिहारच्या राजकारणात मोठे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण काही काळापासून विरोधी पक्षांवर नाराज असलेले बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा एकदा भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.

पीएम मोदी, शाह आणि नड्डा यांच्यात चर्चा?

सूत्रांच्या माहितीनुसार नितीश कुमार यांच्याबाबत भाजपच्या शीर्ष नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याचं बोललं जात आहे. पीएम मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यात नितीश कुमार यांच्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे बिहारच्या राजकारणात लवकरच मोठा बदल पाहायला मिळू शकतो.

राहुल गांधीच्या सभेला उपस्थित राहणार नाही

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार ‘भारत जोडो न्याय यात्रेला देखील उपस्थित राहणार नाहीयेत. ३० जानेवारीला काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पूर्णिया येथे सभा होणार आहे. नितीश यांचा 30 जानेवारीला पाटणा येथे कार्यक्रम असल्याने ते या सभेला उपस्थित राहणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे इंडिया आघाडीला मोठा फटका बसू शकतो.

अलीकडेच एका मुलाखतीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना नितीश कुमार यांच्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. नितीश कुमार यांंच्यासाठी पुन्हा येण्याचे मार्ग मोकळे आहेत का?” त्यावर उत्तर देताना अमित शहा म्हणाले होते – कोणाचा प्रस्ताव आला तर त्यावर विचार केला जाईल.” याआधी ते नितीश कुमार यांच्यासोबत कोणतीही युती करण्यास नकार देत होते. पण आता त्यांनी असे म्हटलेले नाही.

भाजपने फोडला प्रचाराचा नारळ

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रचाराचा नारळ फोडला आहे. आज भाजपकडून व्हिडिओ शेअर करत नवं गाणं प्रसिद्ध करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा भाजपचा पंतप्रधानपदाचा चेहरा असणार आहेत. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वातच या निवडणुका लढवल्या जाणार आहेत.