PM Narendra Modi यांचा आणखी एक विक्रम, सर्व जागतिक नेत्यांना टाकलं मागे
PM Modi on Youtube : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता जागतिक नेते आहेत. १० वर्षापूर्वी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अनेक गोष्टींच्या बाबतीत जगात आपली वेगळी छाप सोडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रभाव कायम आहे. पंतप्रधान मोदींनी आता आणखी एक विक्रम केला आहे. काय आहे तो विक्रम जाणून घ्या.
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात प्रभावी नेते आधीच ठरले आहेत. त्यांनी याबाबत जगातील सर्वच नेत्यांना मागे आधीच टाकले आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोशल मीडियावर देखील प्रभावी आहेत. मोदींची जादू कायम आहे. कारण त्यांनी YouTube वर देखील एक नवा विक्रम रचला आहे. पीएम मोदींच्या यूट्यूब चॅनेलवल 20 दशलक्ष म्हणजेच 2 कोटी सबस्क्राईबर पूर्ण झाले आहेत. हा विशेष दर्जा मिळवणारे पंतप्रधान मोदी हे जगातील पहिले नेते आहेत.
अब्जावधी व्ह्यूज
यूट्यूबवर पीएम मोदी यांच्या चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओला आतापर्यंत 450 कोटी व्ह्यूज मिळाले आहेत. पीएम मोदी अशा प्रकारे यूट्यूबवर देखील जागतिक नेत्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत.
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी म्हटले होते की, मी देखील एक युट्युबर आहे. यूट्यूब फॅनफेस्ट इंडियाला संबोधित करताना त्यांनी म्हटले की, गेल्या 15 वर्षांपासून मी यूट्यूबच्या माध्यमातून देश आणि जगाशी जोडलो गेलो आहे.
यूट्यूब व्यतिरिक्त इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप मोठे चाहते आहेत. पीएम मोदींचे X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर 94 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर 82.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर 48 मिलियन फॉलोअर्स आहेत. मोदींच्या व्हॉट्स अॅप चॅनेलवर 12.6 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.