President Election Result: महाविकास आघाडीला आणखी एक धक्का, द्रौपदी मुर्मु यांना राज्यात 16 आमदारांची अतिरिक्त मते, काँग्रेस-राष्ट्रवादीतही फाटाफूट?

देशभरात 104 आमदरांची मते फुटली असून, ते क्रॉस वोटिंग द्रौपदी मुर्मु यांना मिळाली आहेत. त्यातील 16 मते राज्यातील आहेत. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

President Election Result: महाविकास आघाडीला आणखी एक धक्का, द्रौपदी मुर्मु यांना राज्यात 16 आमदारांची अतिरिक्त मते, काँग्रेस-राष्ट्रवादीतही फाटाफूट?
राज्यात १६ आमदारांचे क्रॉस वोटिंग Image Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 8:35 PM

मुंबई – राष्ट्रपतीपदी एनडीएच्या (NDA)उमेदवार द्रौपदी मुर्मु (Draupadi Murmu)यांची अपेक्षेप्रमाणे निवड झाली आहे. त्यांनी युपीए आणि विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव केला आहे. मात्र त्याही पलिकडे या मतदानाचा महाराष्ट्राच्या राजकारणावरही आगामी काळात परिणाम होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा गट, भाजपा यांच्या व्यतिरिक्त शिवसेना खासदारांच्या भूमिकेमुळे या तिघांनीही द्रौपदी मूर्मू यांना पाठिंबा दिला होता. मात्र त्याव्यतिरिक्त द्रौपदी मूर्मू यांना राज्यातील 16 जास्त आमदारांची मते मिळाल्याची माहिती आहे. भविष्यात राज्याच्या राजकारणात यामुळे मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्दतवण्यात येते आहे. भविष्यातील बदलत्या राजकारणाचे संकेतच यातून मिळाल्याचे बोलले जाते आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीतील 16 आमदार फुटले?

राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत भाजपाने मोठा विजय मिळवत, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते फोडल्याचा संशय आहे. आता एकनाथ शिंदे आणि भाजपा यांचे सरकार सत्तेत आल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा डाव असल्याचे सांगण्यात येत होते. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत फुटलेली 16 मते ही काँग्रेस-राष्ट्रवादीतील असल्याचाच दाट संशय आहे. कारण शिवसेनेने या निवडणुकीत द्रौपदी मुर्मु यांना पाठिंबा जाहीर केला होता. देशभरात 104 आमदरांची मते फुटली असून, ते क्रॉस वोटिंग द्रौपदी मुर्मु यांना मिळाली आहेत. त्यातील 16 मते राज्यातील आहेत. त्यामुळे आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

एकनाथ शिंदे यांचा 200 मतांचा दावा योग्य ठरला

या राष्ट्रपती निवडणुकीपूर्वी शिंदे गट आणि भाजपा आमदारांच्या ट्रायडन्ट हॉटेलमध्ये झालेल्या एकत्रित बैठकीत द्रौपदी मुर्मु यांना राज्यातून 200 मते मिळतील, असा अंदाज एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला होता. त्यत भाजपा 106 , शिंदे गट 50 असे मिळून 170 जण होते. तसेच उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिल्याने शिवसेना आमदारांची 16 मतेही राष्ट्रपती निवडणुकीत मूर्मुंना मिळाली होती. हा सगळा आकडा 185 च्या आसपास जातो. 200 चा आकडा शिंदे यांनी सांगितला होता. त्यामुळे त्यांच्या अपक्षेप्रमाणे १६ मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते आशिष शेलार यांनीही हे संकेत आधी दिले होते, मात्र त्यांनी आकडा सांगितला नव्हता. द्रौपदी मुर्मु या आदिवासी असल्याने त्यांना इतर पक्षातून मतदान होईल, आमदार ते सदसदविवेकबुद्धीने करतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला होता. विशेष म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीत व्हीप नसतो. तसेच गुप्त मतदान असल्याने आता मते नेमक कुणाची फुटली हे काँग्रेस-राष्ट्रवादीला शोधावे लागण्याची शक्यता आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.