भारतात येऊनच भारतविरोधी चाल, मालदीवच्या अध्यक्षांनी पाहा कसा केला गेम

नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला अनेक देशांचे प्रमुख उपस्थित होते. यामध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मुइज्जू देखील भारतात आले होते. मोदी सरकारच्या नव्या कार्यकाळात भारत आणि मालदीवमधील संबंध सुधारतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली होती. पण आता भारतविरोधी भूमिका घेताना दिसत आहेत.

भारतात येऊनच भारतविरोधी चाल, मालदीवच्या अध्यक्षांनी पाहा कसा केला गेम
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 6:18 PM

India-Maldive Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू भारतात आले होते. भारत आणि मालदीव यांच्यात संबंध सुधारतील अशी अपेक्षा होती. मालदीवच्या प्रमुखांनी पीएम मोदीं सोबत चर्चा केली. याशिवाय सोमवारी त्यांनी केंद्रीय मंत्री एस जयशंकर यांच्यासोबत देखील चर्चा केली. पण जेव्हा मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू भारतात होते. दोन्ही देशांमधील संबंध कसे सुधारतील अशी चर्चा सुरु असताना देखील त्यांच्या देशातील संसदीय समितीने तीन करारांचा आढावा जाहीर केला. मालदीवचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम सोलिह हे भारताचे चांगले मित्र होते. त्यांनी भारतासोबत काही महत्त्वाचे करार केले होते. पण आता या आढाव्यामागे मालदीवच्या सार्वभौमत्वाचे कथितपणे उल्लंघन झाल्याचे बोलले जात आहे. एवढेच नाही तर मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपणही तिथेच थांबवण्यात आले.

मालदीवमध्ये भारतविरोधी भूमिका

मालदीवच्या स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, खासदार अहमद अझान म्हणाले की संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा सेवा समितीने मालदीवचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य धोक्यात आणणाऱ्या सोलिहच्या प्रशासनाच्या कृतींची चौकशी करण्यासाठी संसदीय चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आरोप केला की, मागील सरकारच्या कृतींमुळे देशाच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वावर परिणाम झाला आहे. मुइज्जू यांच्या सरकारने गेल्या वर्षी जाहीर केले होते की ते मालदीवच्या जलक्षेत्रातील संयुक्त जलविज्ञान सर्वेक्षणासाठी भारतीय नौदलासोबत कराराचे नूतनीकरण करणार नाहीत.

मालदीवमध्ये हा द्वेष कोण पसरवत आहे?

मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू भारतात असताना मात्र दुसरीकडे मालदीव सरकार भारताविरुद्ध निर्णय घेण्याचं काम करत होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीला उपस्थित राहण्यासाठी मुइज्जू भारतात आले होते. शपथविधी सोहळ्याला येण्यापूर्वी ते म्हणाले की, नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणे ही त्यांच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मोदी सरकारच्या नव्या कार्यकाळात भारत आणि मालदीवमधील संबंध सुधारण्याची अपेक्षा आहे. एकीकडे संबंध सुधारण्याची चर्चा सुरू होती, तर दुसरीकडे मालदीवच्या सरकारी प्रसारक पब्लिक सर्व्हिस मीडियाने शेवटच्या क्षणी मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे थेट प्रक्षेपण रद्द केले.

नोव्हेंबर २०२३ मध्ये मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मुइज्जू यांची ही पहिलीच भारत भेट होती. तसे ते चीन समर्थक मानले जातात. मालदीवच्या अध्यक्ष झाल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील संबंधांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला होता. शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी आपल्या देशातून भारतीय लष्करी जवानांना माघार घेण्याची मागणी केली होती.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.