जगात कुठेही अतिरेकी हल्ला होतो, त्याचे कनेक्शन पाकिस्तानशी असते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पॉडकास्टवर थेट आरोप
PM Modi Podcast With Lex Fridman: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांना तीन तासांचा प्रदीर्घ इंटरव्ह्यूव दिला आहे. या मुलाखतीत त्यांनी जागतिक परिस्थितीपासून ते दहशतवादावर मोठे भाष्य केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकन पॉडकास्टर लेक्स फ्रिडमॅन यांना तीन तासांची मुलाखत दिली आहे. या पॉडकास्टमध्ये पीएम मोदी यांनी अनेक महत्वाच्या मुद्दयावर मनमोकळे केले आहे. एआय रिसर्चर फ्रिडमॅन यांनी या मुलाखतीला आपल्या आयुष्यातील सर्वात शक्तीशाली मुलाखत म्हटले असून मोदी यांचे व्यक्तीमत्व रंजक असल्याचे म्हटले आहे. या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि पाकिस्तान संबंधांवरही भाष्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की इतिहासातील या गोष्टींवर बोलू इच्छीतो जी जगाला माहीती नसेल, साल १९४७ च्या आधी स्वातंत्र्यासाठी सर्व संघर्ष करीत होते. प्रत्येकजण खांद्याला खांदा लावून लढत होते. राष्ट्र स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि स्वातंत्र्याचा आनंद उपभोगण्यासाठी वाट पहात होते. यावर आपण अनेक तास चर्चा करु शकतो. या घटना का घडल्या. नीती निर्माते भारताच्या विभाजनसाठी तयार होते. आणि ते मुस्लीम पक्षाच्या स्वतंत्र राष्ट्र निर्मितीच्या मागणीशीही सहमत होते.
आम्ही त्यांना जगा आणि जगू द्या म्हटले
दु:ख आणि अश्रुंनी भरलेल्या स्थिती भारतीयांना या दु:ख दायक स्थितीला स्वीकारले. रक्ताची खून खराब्याची ही कहाणी आहे. रक्ताळलेल्या जखमी आणि मृतदेहांनी भरलेल्या ट्रेन पाकिस्तानातून येत होत्या. हे एक दु:खद दृश्य होते. आपल्या मर्जीने काम केल्यानंतर आम्ही त्यांना जगा आणि जगू द्या अशी अपेक्षा व्यक्ती केली. परंतू तरीही त्यांनी सहकार्याची भावना जपली नाही. त्यांनी वारंवार भारताशी वैरभाव आणि मतभेद कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आमच्या विरोधात प्रॉक्सी वॉर कायम छेडलेले आहे असे पंतप्रधान हताशपणे म्हणाले.




शांततेच्या मार्गासाठी स्वत: लाहोरला गेलो, पण
पंतप्रधान पुढे म्हणाले की आंतकवादाला विचारधारा समजू नये. ही विचारधारा खून खराबा आणि दहशतीच्या निर्यातीवर पोसली जाते. आम्ही या धोक्याचा एकटेच लक्ष्य नाही आहोत तर जगात कुठेही दहशतवादी हल्ला होतो त्याचे कनेक्शन कुठल्या न कुठल्या रुपात पाकिस्तानशी जोडले जाते. उदाहरण द्यायेच झाले तर ११ सप्टेंबरचा अमेरिकेवरील हल्ल्याचे घ्यावे. या हल्ल्याचा मास्टरमाईंट ओसामा बिन लादेन अखेर कुठे सापडला ? त्याने पाकिस्तानात आश्रय घेतला होता. जगानेही हे मान्य केले आहे की दहशतवाद आणि अतिरेकी मानसिकता पाकिस्तानात आपली मुळे पसरून बसली आहे. आज हे केवळ भारतासाठीच नाही तर जगासाठी धोक्याचे केंद्र बनले आहे. आम्ही त्यांना या मार्गावर राहून काय चांगले मिळू शकते असे वारंवार विचारले. स्टेट प्रॉन्सर्स टेररिझमचा मार्ग सोडण्याचे आवाहन केले. तुमच्या देशाला अराजक तत्वांच्या हवाली करुन काय मिळण्याची तुम्हाला आशा आहे.? मी शांततेच्या मार्गासाठी स्वत: लाहोरला गेलो होतो असेही मोदी यांनी सांगितले.
त्यांना सद्बुद्धी मिळो आणि त्यांनी शांततेचा मार्ग निवडावा
जेव्हा मी पंतप्रधान झालो तेव्हा शपथग्रहण समारंभाला पाकिस्तानला विशेष आमंत्रण दिले होते. आपण एक नवीन सुरुवात करुया असा माझा हेतू होता. शांततेला प्रोत्साहन देण्याच्या माझ्या प्रयत्नाला दुश्मनी आणि विश्वासघाताचे उत्तर मिळाले. आम्ही इमानदारीने ही आशा करतो की त्यांना सद्बुद्धी मिळो आणि त्यांनी शांततेचा मार्ग निवडावा. मला असे वाटते की पाकिस्तानच्या जनतेला ही शांतता हवी आहे. त्यांनी अशांतता आणि संघर्षमय जीवनाला तेही थकले असतील. ते सातत्याने होणाऱ्या अतिरेकी हल्ल्याने थकले असतील जेथे लहान मुलांची हत्या केली जाते आणि अगनित लोकांचा जीव जात आहे असे ते म्हणाले.